मुंबई,
Sharad Pawar group : महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोअर कमिटीच्या बैठकीत शरद पवार यांनी स्पष्ट केलं की, निवडणुकीत मूळ ओबीसी उमेदवारांना प्राथमिकता द्यावी; ज्या ठिकाणी मूळ ओबीसी उमेदवार उपलब्ध नसतील, त्या ठिकाणी पर्यायी कुणबी प्रमाणपत्र असलेल्या इच्छुक उमेदवारांना संधी दिली जाईल.
त्याचबरोबर, कोणत्याही परिस्थितीत भाजपसोबत युती नको, असेही शरद पवार यांनी बैठकदरम्यान सांगितले. यापूर्वीही पक्षाने जास्तीत जास्त तरुण आणि नव्या उमेदवारांना संधी देण्याचा निर्णय घेतला होता, ज्यामुळे पक्षाच्या भविष्यातील रणनितीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
नगर पंचायत आणि नगर परिषद निवडणुकीसाठी मतदान येत्या २ डिसेंबरला होणार असून, मतमोजणी ३ डिसेंबरला होईल. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे निर्णय आणि रणनिती राज्यातील राजकीय समीकरणे बदलू शकतात.