लोणी-आरंभी रस्त्याची तीस वर्षांपासून दूरावस्था

09 Nov 2025 21:37:41
तभा वृत्तसेवा
आर्णी, 
loni-aarmbhi-road : दिग्रस, दारव्हा, आर्णी अशा तीन तालुक्यांना जोडणारा लोणी ते आरंभी रस्त्यामागील तीस वर्षांपासून दुरुस्तीची वाट पाहात आहे. तीस वर्षांत या रस्त्याची मोठी दुरवस्था झाली आहे. दिग्रस-आर्णी मतदारसंघाच्या सीमेच्या मध्यभागी असलेला लोणी-आरंभी रस्ता विकासापासून कोसो दूर असल्याची खंत ग्रामस्थांवाडून व्यक्त केल्या जात आहे. या रस्त्याकडे संबंधित अधिकारी, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी या सर्वांचे दुर्लक्ष होत आहे. त्याची शिक्षा मात्र या मार्गावरील गावकरी भोगत आहेत.
 
 
y9Nov-Rastaa
 
आर्णी विधानसभा व चंद्रपूर लोकसभा मतदारसंघांच्या शेवटच्या टोकावर असलेल्या लोणी, देवगाव व खेड या गावातून जाणाèया लोणी ते आरंभी रस्त्याची मागील तीस वर्षांपासून दुरावस्थाच आहे. दिग्रस व आर्णी मतदारसंघांच्या सीमेवर असल्याने दोन्हीही बाजूच्या लोकप्रतिनिधींकडून याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना मिळणाèया इतर सुविधांचीही दुर्दशाच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
 
 
सध्या आर्णी तालुक्यात असलेली लोणी, देवगाव व खेड ही गावे पूर्वी दिग्रस, दारव्हा तालुक्यात होती. पूर्वी हे दारव्हा व दिग्रस मतदारसंघात होते तर आर्णी मतदारसंघातील शेवटच्या टोकावर असणारी गावे आहेत. त्यामुळे कोणत्याही तालुक्यात गेली तरीही शेवटच्याच टोकावर असल्याने येथील दिग्रस तालुक्याला जोडणारा रस्ता लोकप्रतिनिधीकडून दुर्लक्षितच राहिला आहे.
 
फक्त आश्वासन मिळते...
 
 
प्रत्येक निवडणुकीत लोणी ते आरंभी रस्त्याचे आश्वासन दिले जाते. निवडणुकीच्या प्रचारासाठी या रस्त्याने आल्यानंतर प्रत्येक उमेदवार या रस्त्याची अवस्था उघड्या डोळ्यांनी बघतो. दरम्यान, या भागातील नागरिकांना रस्त्याच्या विकासासाठी उमेदवारांकडून आश्वासनही दिले जाते. मात्र, निवडणूक संपली की, त्या आश्वासनाचा विसर पडतो, अशी प्रतिक्रिया देवगावचे माजी सरपंच माणिक आडे यांनी दिली.
 
 
तर मी स्वतः लोणी ते आरंभी रस्त्यासाठी पाठपुरावा केला. पाठपुरावा केलेला प्रस्ताव मंत्रालयात पेंडिंग आहे. हा प्रस्ताव आमदार राजू तोडसाम यांनी तत्काळ मंजूर करुन ग्रामस्थकांना दिलासा द्यावा, अशी मागणी खेड येथील सरपंच सचिन आडे यांनी केली आहे.
Powered By Sangraha 9.0