मैत्रेयी ठाकरेची इस्रो अभ्यास दौऱ्यासाठी निवड

09 Nov 2025 21:44:31
तभा वृत्तसेवा
वणी,
maitreyi-thackeray : येथील स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूलची इयत्ता नववीत शिकणारी विद्यार्थिनी मैत्रेयी संदीप ठाकरे ही नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेत गुणवत्ता यादीत आली असून तिची इस्रोच्या अभ्यास दौèयासाठी निवड झाली आहे. नोबेल फाउंडेशन आणि भवरलाल अँड कांतीलाल फाउंडेशन, जळगाव यांच्यातर्फे नोबेल सायन्स टॅलेंट सर्च परीक्षेचे आयोजन करण्यात येते. ऑनलाईन, ऑफलाईन आणि मुलाखत या तीन टप्प्यात ही परीक्षा होते.
 
 
y9Nov-Maitreyi-Thakare
 
संपूर्ण राज्यातून अंतिम गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांची इस्रो अभ्यास दौèयासाठी निवड केली जाते. मैत्रेयी ठाकरेंनी इयत्ता आठवीच्या ‘ब’ गटातून अकरावा रँक प्राप्त करून गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. तिचा जानेवारी 2026 मध्ये इस्रो अभ्यास दौरा असून इस्रो अहमदाबाद, आयआयटी गांधीनगरसह बारा शैक्षणिक व सांस्कृतिक स्थळांना भेटी देणार आहे.
 
 
मैत्रेयीच्या या यशाबद्दल नोबेल फाउंडेशन जळगावचे संचालक जयदीप पाटील, स्वर्णलीला इंटरनॅशनल स्कूल वणीचे अध्यक्ष डॉ. व्हीएन रेड्डी, प्राचार्य अन्नपूर्णा पवन यांनी तिचे अभिनंदन केले. तिने आपल्या यशाचे श्रेय शिक्षक आणि आईवडिलांना दिले.
Powered By Sangraha 9.0