जिल्हाधिकार्‍यांनी घेतला कायदा व सुव्यवस्थेचा आढावा

09 Nov 2025 20:23:53
वर्धा, 
Municipal Council Elections : वर्धा, देवळी, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव व सिंदी (रेल्वे) या सहा नगर परिषदेच्या क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. निवडणूक कालावधीत कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडू नये, निवडणुका शांततेत व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा न्याय दंडाधिकारी वान्मथी सी. यांनी नियोजन, कायदा व सुरक्षेचा आढावा घेतला.
 
 
j
 
निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी अवैध रोख रक्कम बाळगणे व वाहतूक करणे, मतदारावर प्रभाव पडेल असे साहित्य वाटप करणे यावर निगराणी ठेवण्यासाठी आवश्यक त्या प्रमाणात स्थिर निगराणी, भरारी, व्हिडिओ निगराणी पथके तयार करावी. यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करुन घ्यावे. राजकीय पक्षाच्या सभेसाठी मैदान आरक्षणाकरिता एका दिवसाकरिता परवानगी द्यावी. निवडणुकी संबंधात येणार्‍या तक्रारीसाठी तक्रार कक्ष स्थापन करावा, विविध प्रकारच्या परवानगीसाठी एक खिडकी कक्ष कार्यान्वित करावा. तसेच रॅलीची परवानगी देताना एकाच वेळी व एकाच मार्गावर विविध पक्षाची रॅली येणार नाही याचे नियोजन करुन परवानगी देण्यात यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी दिल्या.
 
 
तसेच सर्व निवडणूक निर्णय अधिकारी यांनी मतदारांना मतदान केंद्रावर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी व मतदान केंद्र सुस्थितीत असल्याबाबत मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी करुन घ्यावी. दारुबंदीचे गुन्हे, इतर गुन्हे व निवडणूक काळात घडलेल्या गुन्हेगारांवर पोलिस अधिकार्‍यांनी अधीक लक्ष केंद्रीत करावे, अशा सूचना पोलिस अधीक्षक जैन यांनी दिल्या.
Powered By Sangraha 9.0