अनिल कांबळे
नागपूर,
car-fraud : अर्ध्या किंमतीत दुचाकी आणि चार चाकी वाहने मिळवून देण्याचे आमिष दाखवत गाडीची बनावट कागदपत्रे माथी मारून शहरातल्या अनेकांची फसवणूक करण्यात आली. या रॅकेटचा लकडगंज पाेलिसांनी उलगडा केला. या प्रकरणात पाेलिसांनी चाैघांविरिद्ध गुन्हा दाखल एकाला अटक केली. िफराेज हमीद खान (30), रा. सुभान नगर, वहिद आलम (35), रा. हसनबाग, सरफराज माेहम्मद शकील (35), रा. शहिद नगर, रनाळा, जय कुखे (35), रा. काॅटन मार्केट अशी अनेकांना लाखाे रुपयांचा गंडा घालणाèया या चाैघांच्या टाेळीची नावे आहेत. आराेपी माेहम्मद सरफराजला लकडगंज पाेलिसांनी अटक केली आहे.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लकडापूल येथील रहिवासी रजा रियाजखान पठाण यांची एका नातेवाईकाच्या माध्यमातून िफराेज खानची ओळख झाली हाेती. िफराेजने त्यांना कमी किमतीत दुचाकी आणि चारचाकी वाहने मिळवून देताे, असे आमिष दाखवले. त्यामुळे रजा यांनी कारसाठी िफराेजला 7 लाख 50 हजार रुपये दिले. मात्र, त्याने दिलेली कागदपत्रे बनावट असल्याचे रजा यांच्या लक्षात आले. त्यांनी चाैकशी केली असता िफराेजच्या टाेळीने आणखी 15 जणांची 23 लाखांनी फसवणूक केल्याचे त्यांना आढळले. या सर्वांनी लकडगंज पाेलिस ठाणे गाठत तक्रार दिली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करत सरफराजला अटक केली.
आराेपी वाढण्याची शक्यता
या रॅकेटमध्ये आरटीओ विभागातील कुण्यातरी कर्मचाèयाचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. बनावट कागदपत्र तयार करण्यासाठी आणखी काही आराेपींचा या रॅकेटमध्ये सहभाग आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आराेपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे.