पूर्णब्रह्म योजनेतून वृद्धाश्रमांना किराणा व वस्त्रदान

09 Nov 2025 14:29:11
नागपूर,
Purna Brahma Yojana छत्रपती गार्डन ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या वतीने ‘पूर्णब्रह्म योजना’ अंतर्गत वृद्धाश्रमांसाठी किराणा सामग्री, बेडशीट आणि ब्लॅंकेटचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पूर्णब्रह्म अभियानाचे अध्यक्ष सुरेश उरकुडे होते. ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानचे सचिव राजू मिश्रा यांनी कार्यक्रमाचे मार्गदर्शन केले. हा उपक्रम छत्रपती नगर येथील शीतला माता मंदिराच्या प्रांगणात पार पडला. यावेळी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिक आणि महिला उपस्थित होत्या.
 

Purna Brahma Yojana 
सौजन्य: सुरेश चव्हारे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0