रेल्वेतून गांजाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक

09 Nov 2025 21:04:56
अनिल कांबळे
नागपूर, 
smuggling-of-marijuana : ओडिशातील पूरी येथून शिर्डीकडे निघालेल्या 50 किलाे गांजाची तस्करी राेखण्यात लाेहमार्ग सुरक्षा दलाच्या पथकाला शनिवारी रात्री यश आले. भंडारा ते नागपूर स्थानकादरम्यान 20857 पुरी-शिर्डी साई एक्सप्रेसची तपासणी केली असता रेल्वे सुरक्षा दलाने ही गांजा तस्करी पडकली.
 
 
jk
 
नीलू हांडिया गाैडा(19), रा. सटानला, जि. गंजम (ओडिशा), शुभम शिवशंकर गुप्ता (24 ) रा. दुलईपूर मुगलसराय, अमन प्रशांत गुप्ता (25) रा. आनंद नगर काली महाल, मुगलसराय ((उत्तर प्रदेश) अशी या गांजा तस्करांची नावे आहेत. रेल्वे सुरक्षा दलाच्या गुप्तचर शाखेला याचा सुगावा लागला हाेता. याची माहिती रेल्वे सुरक्षा दलाचे मुख्य आयुक्त मुनव्वर खुर्शीद यांनी दक्षिण-मध्य-पूर्व रेल्वेचे विभागीय सुरक्षा आयुक्तांनी सतर्क केले. त्यांनी ऑपरेशन नार्काेस अंतर्गत गाडीच्या प्रवासादम्यान सर्व रेल्वे स्थानकांना अलर्ट जारी केला. धावत्या रेल्वेत एकेक बाेगी तपासण्याची माेहिम सुरू करण्यात आली. रेल्वेने भंडारा स्थानक साेडून नागपूरकडे प्रयाण करताच ए-1 आणि ए2- दाेन डब्यांची तपासणी केली असता सुरक्षा दलाला दाेन डब्यांमधून प्रवास करणारे तीन तस्कर सापडले. ओडीशातील जगन्नाथ पुरी येथून शिर्डीकडे जाणारी ही रेल्वे नागपूर स्थानकावर पाेहाेचल्यानंतर तिघांनाही इतवारी रेल्वे सुरक्षा दलाकडे स्वाधिन करण्यात आले.
Powered By Sangraha 9.0