पाकिस्तानच्या अडचणी वाढल्या; तालिबानला भारत आणि रशियाचा पाठींबा

09 Nov 2025 10:44:05
काबुल,  
india-and-russia-support-taliban अफगाणिस्तान आणि पाकिस्तान यांच्यात तुर्कीमध्ये सुरू झालेल्या शांतता चर्चांवर पाकिस्तानच्या हल्ल्यांची छाया पडली आहे. काबुल आणि इस्लामाबादमधील संबंध आता अत्यंत नाजूक टप्प्यावर पोहोचले आहेत. एका बाजूला दोन्ही देशांनी नवी शांतता चर्चा सुरू केली, तर दुसऱ्या बाजूला गुरुवारी अफगाण-पाक सीमेजवळील स्पिन बोल्डक परिसरात पाकिस्तानने गोळीबार भडकवला.

india-and-russia-support-taliban 
 
या दोन्ही देशांनी यापूर्वी 19 ऑक्टोबरला दोहा येथे युद्धविराम करारावर स्वाक्षऱ्या केल्या होत्या. मात्र, मागील आठवड्यात इस्तंबूलमध्ये झालेल्या दुसऱ्या फेरीतील चर्चा कोणताही ठोस तोडगा निघाल्याशिवाय संपल्या, त्यामुळे तिसऱ्या फेरीच्या चर्चेची गरज निर्माण झाली आहे. अफगाण घडामोडींवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, काबुलविषयी पाकिस्तानच्या आक्रमक धोरणांमुळे दोन्ही देशांतील संबंध तणावपूर्ण आणि थंड राहण्याची शक्यता आहे. india-and-russia-support-taliban दरम्यान, अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला रशियाकडून समर्थन मिळाले आहे. गुरुवारी रशियाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सर्गेई शोइगू यांनी सामूहिक सुरक्षा करार संघटना (सीएसटीओ) आणि स्वतंत्र राष्ट्रकुल (CIS) यांच्या संयुक्त बैठकीत अफगाणिस्तानातील “महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक घडामोडी”चा उल्लेख केला. त्यांनी अफगाणिस्तानातील सुरक्षा परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त करत, त्या देशाला पुन्हा प्रादेशिक आर्थिक चौकटींमध्ये समाविष्ट करण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
याच बैठकीत सीएसटीओचे महासचिव इमानगाली तस्मागाम्बेटोव यांनी अफगाणिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्यातील सीमासुरक्षा बळकटीसाठी नव्या कार्यक्रमावर भर दिला. त्यांनी स्पष्ट केले की अफगाणिस्तानची स्थिरता आणि विकास हे त्याच्या शेजारी देशांच्या, विशेषतःसीएसटीओ सदस्य राष्ट्रांच्या हितासाठी आवश्यक आहे. india-and-russia-support-taliban या सर्व घडामोडींमध्ये भारतही अफगाणिस्तानसोबतच्या सहकार्याच्या भूमिकेत दिसला. भारतीय राजनैतिक मिशनच्या प्रमुखांनी या आठवड्यात अफगाणिस्तानच्या कृषी मंत्र्यांची भेट घेऊन कृषी क्षेत्रातील संशोधन, प्रशिक्षण आणि क्षमता विकासासाठी मदतीचे आश्वासन दिले आहे.
Powered By Sangraha 9.0