पाेलिसांच्या सतर्कतेने वाचले एटीएममधील लाखाे रुपये
09 Nov 2025 12:50:51
अनिल कांबळे
नागपूर,
police-saves-lakhs-of-rupees-from-atm नेहमी चाेरी झाल्यानंतरच पाेलिस घटनास्थळावर पाेहचतात, अशी वल्गना पाेलिसांची केली जाते. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर महादुला रमाई नगर सर्विस राेडवर एस.बी.आय बँकेचे एटीएम फोडत हाेते. मात्र, काेराडी पाेलिसांनी माहिती मिळताच क्षणाचाही विलंब न करता थेट त्या एटीएमच्या दिशेने धाव घेतली. एटीएममधून लाखाे रुपये चाेरी हाेण्यापूर्वीच पाेलिस धडकले. पाेलिसांनी वेळेवर पाेहचून एटीएममधील पैसे चाेरी हाेण्यापासून वाचवले.
गेल्या काही दिवसांपासून काेराडी पाेलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांचा वावर वाढला हाेता. त्यामुळे पाेलिस ठाण्यातील डीबी पथकाने डाेळ्यात तेल घालून रात्रीपासून ते पहाटेपर्यंत गस्त घालणे सुरु केले. शुक्रवारी मध्यरात्रीनंतर दाेन वाजताच्या सुमारास महादुला रमाई नगर सर्विस राेडवर एस.बी.आय बँकेचे एटीएम फोडण्यासाठी काही चाेरटे शिरले. त्यांच्याकडे एटीएम मशिन कापण्यासाठी गॅस कटर आणले हाेते. त्यांचा एटीएम मशिन कापून पैसे लुटण्याचा त्यांचा डाव हाेता. चाेरट्यांनी एटीएम मशिन अर्धवट कापली हाेती. police-saves-lakhs-of-rupees-from-atm यादरम्यान, काेराडीचे ठाणेदार पाेपटराव धायताेंडे यांच्या मार्गदर्शनातील डीबी पथकातील पाेलिस हवालदार लिलाधर गाेहाणे, पाेलिस अंमलदार बबन वैद्य, संजय जाधव यांना माहिती मिळताच गस्तीवरुन थेट महादुलाच्या दिशेने रवाना झाले. काही मिनिटांतच एटीएमजवळ पाेहचले. पाेलिसांच्या पाळतीवर असलेल्या एका चाेरट्याने साथिदारांना इशारा केला. त्यामुळे विना नंबर प्लेटच्या कारमधून आलेल्या चाेरट्यांनी पाेलिसांना बघताच पळ काढला.
22 लाख रुपये वाचले
एटीएममध्ये जवळपास 22 लाख रुपयांची राेकड हाेती. जर पाेलिसांनी घटनास्थळावर पाेहचण्यासाठी काही मिनिटे उशिर केला असता तर चाेरट्यांनी राेकड लंपास केली असती. police-saves-lakhs-of-rupees-from-atm मात्र, पाेलिसांनी अगदी वेळेवर सतर्कता दाखवून चाेरट्यांचा डाव हाणून पाडला. या प्रकरणी काेरडी पाेलिसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटीव्ही ुटेजच्या माध्यमातून चाेरट्यांचा शाेध घेणे सुरु आहे. ही कारवाई पाेलिस हवालदार लिलाधर गाेहाणे, पाेलिस अंमलदार बबन वैद्य, संजय जाधव यांनी केली.