इच्छुकांनी तापविले आर्णी शहरातील राजकीय वातावरण

09 Nov 2025 21:42:17
राजेश माहेश्वरी
आर्णी, 
aarni-elections : नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबरला मतदान होणार आहे. तर दुसèयाच दिवशी म्हणजे 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर जिल्ह्यात मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे सध्यातरी शहरात इच्छुक उमेदवार मतदारांच्या भेटी घेऊन राजकीय वातावरण चांगलेच तापवित असल्याचे दिसून येत आहे. आर्णी नगरपालिकेत एकूण 11 प्रभाग आहे. प्रत्येकी दोनप्रमाणे एकूण 22 जागेकरिता ही लढत होणार आहे. यासाठी 26 हजार 857 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यापैकी 13 हजार 497 पुरुष, तर 13 हजार 358 महिलांचा समावेश आहे.
 
 
j
 
यंदा पुन्हा नगराध्यक्षाची निवड थेट जनतेतून होणार आहे. अनुसूचित जातीसाठी नप अध्यक्षपद राखीव निघाले आहे. निवडणुकीमुळे ठिकठिकाणी तसेच प्रभागांतर्गत राजकीय गुप्त बैठकांच्या सत्राला सुरवात झाली आहे. पूर्वीच्या काही सदस्यांनी स्वतःसाठी प्रयत्न चालविला आहे. तर काही नवख्यांनीसुद्धा निवडणूक रिंगणात भाग्य आजमावण्यासाठी राजकीय नेत्यांच्या भेटी सुरू केल्या आहेत.
इच्छुकांनी बांधले गुडघ्याला बाशिंग
 
 
नगराध्यक्ष, नगरसेवकांसाठी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी मिळविण्यासाठी जोरात हालचाली सुरू केल्या आहेत. नेतेमंडळींकडून नेमके कुणाला उमेदवारी मिळेल, याचा अंदाज लागत नाही. विशेष म्हणजे या निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार गट), शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, मनसे, प्रहार, आझाद समाज पार्टी, बीएसपी या पक्षासह अपक्षही नगर परिषद निवडणुकीत उतरण्याच्या तयारीला लागलेले आहे. कांग्रेस, शिवसेना, भाजपाने इच्छुक उमेदवारांचे इंटरव्यू घेतले आहे. तर कोणत्या पक्षाची कोणासोबत युती होणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे.
Powered By Sangraha 9.0