पुसद नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक

09 Nov 2025 21:46:04
तभा वृत्तसेवा
पुसद, 
pusad-municipal-council-general-election : नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शप) आणि काँग्रेस पक्ष यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ही घोषणा 8 नोव्हेंबर रोजी पुसद येथे आयोजित पत्रपरिषदेत करण्यात आली.
 
 
y9Nov-Darbaar
 
पत्रपरिषदेत बोलताना आघाडीच्या नेत्यांनी, पुसदच्या विकासासाठी आणि लोकशाही व विकासाच्या मूल्यांसाठी एकत्र येणे ही काळाची गरज आहे. नगरपरिषदेतील सत्तांतरासाठी आणि भाजपाच्या अपयशाला मतदारांनी दिलेले उत्तर बळकट करण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, असे सांगितले.
 
 
यावेळी महाविकास आघाडीचे माजी विधान परिषद सदस्य डॉ. वजाहत मिर्झा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सरचिटणीस व निवडणूक प्रमुख शरद मैंद, दिलीप एडतकर, डॉ. मोहंमद नदीम, अनिल शिंदे, डॉ. अकील मेमन, रवी पांडे, सय्यद ईस्ताक, अ‍ॅड. वीरेंद्र राजे, विजय चव्हाण, अनुकूल चव्हाण, परमेश्वर जयस्वाल तसेच स्थानिक पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
आघाडीच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना सुरुवात झाली आहे. आगामी निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार असून महायुतीत अजूनही धूसफूस पाहायला मिळत असून महायुती पुसद नगरपरिषदेच्या निवडणुका स्वतंत्र लढणार, असे चित्र सध्यातरी दिसते आहे.
Powered By Sangraha 9.0