अनिल कांबळे
नागपूर,
Sexual assault : गणेशपेठ हद्दीतील एका 27 वर्षीय दिव्यांग तरुणीच्या घरात घुसून एका तरुणाने बळजबरी लैंगिक अत्याचार केला. ही घटना तरुणीने पालकांना सांगितल्यानंतर उघडकीस आली. या प्रकरणी गणेशपेठ पाेलिसांनी तक्रारीवरुन गुन्हा दाखल करुन आराेपीला अटक केली. शैलेश मधुसूदन पंडिया असे आराेपी युवकाचे नाव आहे.
पीडित 27 वर्षीय तरुणी मानसिकदृष्ट्या विकलांग असून गणेशपेठ परिसरात कुटुंबासह राहते. तरुणीच्या आईने पाेलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आराेपी शैलेश मधुसूदन पंडिया याच परिसरात राहताे आणि इलेक्ट्रिशियन म्हणून काम करताे. ताे सुमारे तीन महिन्यांपूर्वी तिच्या वडिलांच्या घराजवळील एका घरात इलेक्ट्रीक िफटींगचे काम करण्यासाठी आला हाेता. दरम्यान, त्याची नजर तरुणीवर पडली. घरात कुणीही नसल्याबाबत त्याला कल्पना आली. गेल्या 7 नाेव्हेंबर राेजी दुपारी ताे घरात शिरला. काेणीही नसल्याचा ायदा घेत तरुणीच्या मानसिकदृष्ट्या विकलांगतेचा गैरायदा घेऊन तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. संध्याकाळी कुटुंब परत आले तेव्हा त्यांना घटनेची माहिती मिळाली. पीडितेच्या आईने तत्काळ गणेशपेठ पाेलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी आराेपीविरुद्ध बलात्काराच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.