वंदे मातरम् हे फक्त एक गीत नाही तर मनात चेतना जागवणारा मंत्र: श्रृती कान्हेकर

09 Nov 2025 20:15:16
मानोरा, 
shruti-kanhekar : वंदे मातरम् हे फक्त एक गीत नाही, तर स्वातंत्र्य संग्रामातील ज्वलंत प्रेरणा, लाखो क्रांतिकारकांच्या मनात चेतना जागवणारा मंत्र, आणि देशभक्तीची शाश्वत ओळख आहे. असे प्रतिपादन प्रमुख वक्त्या श्रृती कान्हेकर यानी केले.
 
 
 k
 
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या निर्देशानुसार संत सेवालाल महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मानोरा यांच्या वतीने वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध देशभक्तीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम ७ नोव्हेंबर रोजी एल.एस.पी.एम. हायस्कूल, धामणी ता. मानोरा येथे देशभक्तीच्या जल्लोषात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करून देशप्रेमाचा जागर केला.
 
 
शासनाच्या निर्देशानुसार या निमित्ताने शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थ्यांसाठी वंदे मातरम् गीतगायन, देशभक्तीपर भाषणे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध लेखन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
 
 
कार्यक्रमात श्रृती कान्हेकर या वंदे मातरम् या विषयावरील प्रमुख वत्या म्हणून उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार डॉ. संतोष येवलीकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ठाणेदार नैना पोहेकर, गटशिक्षणाधिकारी अनिल पवार, शाळेचे अध्यक्ष व्ही.बी. पाटील, प्राचार्या वंदना पाटील, निर्मला पाटील, पत्रकार राजू ठाकरे, अब्दुल नावेद अब्दुल सलाम, पुंडलिक जटाळे महाराज, मंजुळा पवार याची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य आर. पी. नाईकनवरे यानी, सुत्रसंचलन भेडे तर आभार प्रदर्शन निलेश तायडे यानी केले. देशभक्तीच्या भावनेने ओतप्रोत झालेल्या या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्तीची प्रेरणा निर्माण झाली.
 
 
पुढे बोलताना श्रृती कान्हेकर महणाल्या की बंकिमचंद्र चटर्जी यांनी १८७५ साली रचलेले हे गीत भारत मातेच्या चरणी अर्पण केलेले अमर वंदन आहे. या गीताने स्वातंत्र्य लढ्यातील वीरांना धैर्य दिले, संघर्षाची आग पेटवली आणि गुलामीच्या अंधारात आशेचा सूर्य उगवला. आज १५० वर्षानंतरही या गीताचा स्वाभिमान, प्रेरणा आणि ऊर्जा किंचितही कमी झालेली नाही, असे सागीतले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी, गोविंद वाघ, सध्या अर्धापुरकर,सुरज जजाळ, स्वप्नील शिदे, एस. के. ठाकूर, केशव जाधव, डी. ए. रोठे, प्रशांत पाचपोर, गणेश सरोदे, महेश मुराळे, सुमीत घोडे, ओम निकम, प्रदिप किनाके, शकर जाधव, पवन घोडे यानी परिश्रम घेतले.
Powered By Sangraha 9.0