वर्धेच्या ऑक्सिजन पार्कवर बूच वृक्ष महोत्सव

09 Nov 2025 19:43:47
पावल ही फुलांचे...
वर्धा,
oxygen-park-booch-tree-festival : निसर्ग सेवा समिती द्वारा निर्मित ऑक्सिजन पार्क परिसराच्या निर्मितीस २५ वर्ष पूर्ण होत असल्याने रजत जयंती वर्षानिमित्ताने ‘पावले फुलांचे पुष्पोत्सव’ या नावीन्यपुर्व उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या पुष्पोत्सवांर्तगत बुच वृक्षाचे अंतरंग निसर्ग सेवा समितीच्या ऑक्सिजन पार्कवर काल शनिवारी सकाळी उलगडण्यात आले.
 
 
 
oxygen-park-booch-tree-festival
 
 
 
प्रमुख वता म्हणून वृक्ष आणि निसर्ग अभ्यासक तज्ज्ञ डॉ. आरती प्रांजळे घुसे होत्या. अध्यक्षस्थानी वर्धा तरुण भारताचे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल व्यास होते तर निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांची उपस्थिती होती.
 
 
यावेळी डॉ. आरती प्रांजळे घुसे यांनी बुच वृक्षाविषयी शास्त्रीय अभ्यासपूर्ण विस्तृत माहिती दिली. आकाश नीम बूच अशा विविध नावाने हा वृक्ष प्रसिद्ध आहे. या वृक्षाच्या फुलांच्या मंद सुगंधाने सर्वांचे अंतकरण प्रफुल्लीत होऊन शांत होऊन जाते. शुभ्र रुपेरी फुलांचा सुहास रात्रभर दळवळतो. नोव्हेंबर डिसेंबर आणि पुन्हा एप्रिल ते मे या महिन्यात या फुलांचा मंजीर्‍या डेखाच्या टोकाला गुच्छ प्रमाणे लागतात फुलं उमलतात आणि काही वेळात गळून पडतात. जमिनीवर फुलांचा जणू सडा पडलेला असतो. हे वृक्ष थेट ८० फुटापर्यंत उंच वाढणार सरळ बांधायचा सुंदर सुदापर्णी वृक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे दोर्‍या शिवाय गुंफल्या जाणारी या झाडाची फुलं असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
प्रफुल्ल व्यास यांनी तरुण भारतच्या शताब्दी वर्षानिमित्ताने पर्यावरण पूरक असे अनेक विविध उपक्रम घेतल्याची माहिती दिली. यात विविध प्रजातीची बीज संकलन, तुळशी या औषधी युक्त वृक्ष रोप मोठ्या प्रमाणात वाटप करून लोकांमध्ये पर्यावरण व वृक्ष संवर्धनाच्या बाबतीमध्ये मूल्य रुजवण्याचा प्रयत्न केल्याचे सांगितले.
 
 
बूच वृक्ष ज्याला आकाश नीम, मिनी चमेली निम चमेली अशा अनेक नावाने प्रसिद्ध असलेल्या या वृक्षाच्या फुलांचं स्वागत करण्यात आले. सुरुवातीला आकाश नीम या वृक्षास सर्व निसर्ग सेवक तसेच प्रमुख पाहुण्यांनी भेट देऊन जलसिंचन करून पावलं फुलांचे बुच महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुढेही प्रत्येक आठवड्यामध्ये विविध वृक्षांचा महत्त्वाचे वैशिष्ट्यपूर्ण माहिती सांगणारा कार्यक्रम निमित्ताने घेण्यात येणार्‍या असे निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष मुरलीधर बेलखोडे यांनी सांगितले.
 
 
ऑसिजन पार्क परिसरात दैनिक योग करणारे तसेच निसर्ग सेवक उपस्थित होते. निवृत्त शिक्षक अनिल देवतळे यांनी बूच फूलोत्सव निमित्ताने स्वरचित कविता सादर केली.
 
 
तभा नागपूरची प्रेरणा
 
 
तरुण भारतच्या वतीने शताब्धी वर्षात नागपूर येथे सुरू असलेल्या पावलं फुलांची या अभियानाच्या संकल्पनेवरच वर्धेतही निसर्ग सेवा समितीच्या वतीने हा कार्यक्रम ऑसिजन पार्क येथे सुरू करण्यात आला आहे.
Powered By Sangraha 9.0