वर्धा,
wardha-sai-mandir : वर्धा शहरातील प्रसिद्ध साई मंदिरच्या साई सेवा मंडळाची सर्वसाधारण आमसभा गुरुवार ६ रोजी साई मंदिराच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळी पुढील तीन वर्षांसाठी नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. अध्यक्ष म्हणून विठ्ठल व्यवहारे तर सचिव म्हणून सुभाष राठी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

वर्धा शहरात साई मंदिर धार्मिक कार्यक्रमांसह विविध सामाजिक उपक्रमांसाठी ओळखले जाते. जवाहरलाल राठी यांनी १९८९ मध्ये या मंदिराची निर्मिती केली. तेव्हापासून या मंदिरात सेवा देणारे विठ्ठल व्यवहारे यांना अध्यक्ष म्हणून पहिल्यांदाच जबाबदारी दिली. उपाध्यक्ष म्हणून टिप्पन्ना भंडारी, अनुप कृपलानी, सचिव सुभाष राठी, उपसचिव श्रीकांत गांधी तर सदस्य म्हणून घनश्याम सावळकर, नत्थू कुबडे, चंद्रशेखर राठी, डॉ. विजय बोबडे, मदन राठी व विजय ठकरे यांची निवड करण्यात आली. सन्मानिय सभासद म्हणून अनंत मेघे, अरूण काशिकर, अशोक झिलपे, सुधाकर कापसे यांची तर सल्लागार समिती सदस्य म्हणून राजेंद्र भुतडा, मंगेश अंदुरकर, मिलिंद डहाके, राजेंद्र चव्हाण, अमोल हिवसे यांची नियुती करण्यात आली. नवनियुत संचालक मंडळाचे माजी संचालक तसेच साई भतांनी अभिनंदन केले.