वर्धेत शरद पवार गटाची पाण्याशिवाय मासळी

09 Nov 2025 19:27:44
फिरता फिरता
प्रफुल्ल व्यास
वर्धा, 
suresh-deshmukh : वर्धा जिल्ह्यात नगर पालिका उमेदवार तिकिटांसाठी नेत्यांच्या घरी चकरा मारत असताना राजकीय परिपक्वता नसलेले समीर देशमुख यांनी काँग्रेसकडे नगराध्यक्षपद राकाँ शरद पवार गटाला देण्याची मागणी केल्याने आषाढी गेली एकादशीच्या घरी उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पाण्याशिवाय मासळी राहू शकत नाही तसेच राजकारणाशिवाय नेते राहू शकत नसल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
 
 
 k
 
वर्धा जिल्ह्यातील राजकारण माजी आमदार सुरेश देशमुख यांच्या भोवती बर्‍या पैकी फिरत होते. हळूहळू पुत्रप्रेम जागृत झाले आणि राजकारणात समीर देशमुख यांनी शिक्षण, सहकार आणि राजकारणाचे आयते ताट वाढून मिळाले. दुर्दैवाने त्यांना आयते मिळालेल्या ‘मलईदार’ तीन पैकी एकही ठिकवून ठेवता आले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक त्यांच्या काळात डबघाईस आली. बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयही पोरके झाले. शेकडोंचे ३०-४० महिन्यांचे वेतन अजूनही दिल्या गेले नाही.
 
 
दिवाळीपूर्वी कॉलेजमध्ये नॉन टिचींगने चांगलाच गोंधळ घातल्याने २५ टके वेतनावर कर्मचार्‍यांची दिवाळी केली. हे सर्व असतानाच समीर देशमुख यांची राजकारणातील महत्त्वाकांक्षा प्रत्येक निवडणुकीत जागृत होते. २०२५ च्या लोकसभा निवडणुकीत परंपरागत वर्धा लोकसभा मतदार संघ शरद पवार गटाकडे सोडण्यासाठी त्यांनी जंगजंग पच्छाडले. हा मतदार संघ काँग्रेसच्या हातून शरद पवार यांनी हिसकावून घेतला. परंतु, निष्ठावान म्हणून ओळख दाखवणार्‍या देशमुख पिता पुत्राचा विचार न करता काँग्रेसचे नेते आर्वीचे माजी आमदार अमर काळे यांना लोकसभेची तिकीटही दिली आणि निवडूनही आणले. त्यावेळी या पितापुत्राने नाराजी व्यत केली होती.
 
 
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा झेंडा डोयावर घेत हिंगणघाटचे युवा नेते अतुल वांदिले यांनी प्रचंड परिश्रम घेतले. त्या परिश्रमाचे फळ म्हणून वांदिले यांना वर्धा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्षपद बहाल करण्यात आले. त्यावेळी समीर देशमुख यांनी विरोध केला. एवढेच नव्हे तर आम्ही दिवाळीनंतर विचार करू असे बापलेकाने जाहीर केले होते.
 
 
दिवाळीनंतर देव दिवाळी येण्याची वेळ आणि लोकशाहीचा उत्सवही याच काळात सुरू झाला आहे. लोकसभा मागणार्‍या समीर देशमुख यांनी आता वर्धा नगर पालिका देण्याची मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनोज चांदूरकर आणि नेते शेखर शेंडे यांना केली. पक्षात कोणतीही जबाबदारी नसताना एवढेच नव्हे तर समाजमाध्यमावर टाकलेल्या पोस्टमध्येही पक्ष चिन्ह न टाकणार्‍या समीर देशमुख यांनी पुन्हा नगर पालिकेसाठी फिल्डींग लावली. आता वर्धेत शरद पवार गटाचे मोजकेच उरले असताना नगर पालिका अध्यक्षपदाची जागा काँग्रेस कशी सोडणार असा प्रश्न सामान्य नागरिकांनी उपस्थित केल्याचे फिरता फिरता कळले. वर्धेत शप गटाची मागणी करणारे देवळीत मात्र एका मोठ्या पक्षाला स्वत: पाठींबा देण्याची तयारीही त्यांनी दाखवल्याची चर्चा आहे.
 
अतुल्य निवडणूक
 
 
गेल्या ८ वर्षांनंतर जिल्ह्यात नगर पालिकेची निवडणूक होत आहे. देशात आणि राज्यात भाजपाची सत्ता आणि वर्धेतही भाजपाचेच पालकमंत्री असल्याने या पक्षाकडे तिकीट मागणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील राजकीय हालचाली बघात ही निवडणूक अतुल्य होण्याची शयता नाकारता येत नाही.
Powered By Sangraha 9.0