कल्याण निधीतून ३८ पोलिसांना बिनव्याजी ‘अर्थबळ’

09 Nov 2025 20:31:31
वर्धा, 
wardha-welfare-fund : पोलिस विभागाच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करून जिल्ह्याच्या पोलिस कल्याण निधीत अधिकची भर टाकली जाते. याच पोलिस कल्याण निधीतून पोलिसांना वैद्यकीय व शैक्षणिक कामासाठी बिनव्याजी कर्ज दिले जाते. कर्जाची परतफेड १८ हप्त्यातून होत असल्याने पोलिस कल्याण निधीतील बिनव्याजी अर्थबळ गरजू पोलिसांसाठी दिलासा दायकच ठरत आहे.

jk 
 
पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या कार्यकाळात १ जानेवारी ते ऑटोबर २०२५ अखेरपर्यंत वैद्यकीय कारणासाठी ३० पोलिसांना २८ लाख ७० हजारांचे बिनव्याजी कर्ज वैद्यकीय सेवा या योजनेंतर्गत देण्यात आले आहे. पोलिस कल्याण निधी योजनेंतर्गत १ जानेवारी ते ऑटोंबर २०२५ अखेरपर्यंत ८ पोलिसांना त्यांच्या पाल्याच्या शिक्षणासाठी ६ लाख २० हजारांचे बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे.
 
 
पोलिस कल्याण निधी अंतर्गत अंत्यविधीसाठी मदत ही योजनाही राबविली जात आहे. या योजनेत १२ पोलिस कुटुंबियांना लाभ देण्यात आला आहे. प्रत्येकी २० हजार रुपये असे २ लाख ४० हजारांची मदत पोलिस कुटुंबियांना देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
वैद्यकीय मदत या योजनेंतर्गत पोलिस विभाग गरजू पोलिस कर्मचार्‍यांना ५ लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून देते. तर पोलिसांच्या पाल्यासाठी असलेल्या शैक्षणिक योजनेंतर्गत ७५ हजारपर्यंतचे बिनव्याजी कर्ज पोलिसांना देण्यात आले. 
 
 
सावंगी मेघे पोलिस ठाण्यात सेवा देणारे पोलिस शिपाई अजय धनवीज हे अपघातात गंभीर जखमी झाले. डोयाला गंभीर दुखापत असल्याने त्यांच्यावर नागपूर येथे खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस कल्याण निधी अंतर्गतच्या वैद्यकीय मदत योजनेच्या लाभासाठी त्यांचा प्रस्ताव प्राप्त होताच. त्यांना पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांनी ३ लाखांचे बिनव्याजी कर्ज मंजूर केले. यामुळे धनवीज कुटुंबियांना मोठा आधार मिळाला आहे.
Powered By Sangraha 9.0