आगामी निवडणुकांसाठी भाजयुमो ‘मिशन मोड’वर

09 Nov 2025 21:59:39
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Suraj Gupta : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर भाजयुमो जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या संघटनात्मक झंझावाती जिल्हा दौèयाला सर्वत्र उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
 
 
y9Nov-Suraj-Gupta
 
माजी मंत्री मदन येरावार व भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान यांच्या मार्गदर्शनात हा दौरा आयोजित करण्यात आला. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘युवा संवाद’ मेळावे आणि मंडळ कार्यकारिणीच्या बैठकांद्वारे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केले जात आहे. आगामी निवडणुकांमध्ये पक्षाला यश मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्षम करणे पक्षाची ध्येयधोरणे पक्षाची शिस्त तरुणांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देणे हा या दौèयाचा मुख्य उद्देश आहे.
 
 
युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून मंडळ कार्यकारिणी बैठकीत मंडळ स्तरातील पदाधिकाèयांना जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गण प्रभारी, नगर परिषद वॉर्ड प्रभारी म्हणून जबाबदारी निश्चित करून देऊन जिल्हा पदाधिकारी व मंडळ पदाधिकाèयांचा समन्वय साधून जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवकांना सोबत जोडून भाजपाला आगामी निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वश्रेष्ठ पक्ष करण्याच्या संकल्प घेऊन युवा मोर्चाचा प्रत्येक कार्यकर्ता कामाला लागला आहे.
 
 
या जिल्हा दौèयाची सुरवात रविवार, 2 नोव्हेंबरला आर्णी व घाटंजी येथील कार्यक्रमापासून करण्यात आली. यावेळी आर्णी विधानसभेचे आमदार राजू तोडसाम विशेष करून उपस्थित होते. तसेच सोमवार, 3 नोव्हेंबरला कळंब व राळेगाव येथील बैठकी पार पडल्या. मंगळवार, 4 नोव्हेंबरला यवतमाळ ग्रामीणची बैठक घेण्यात आली. यावेळी माजी जिप उपाध्यक्ष श्याम जयस्वाल उपस्थित होते. बुधवार,5 नोव्हेंबरला बाभुळगाव येथील बैठक झाली. शुक्रवार, 7 नोव्हेंबरला पांढरकवडा येथे युवा संवाद मेळावा व युवकांचा पक्ष प्रवेश कार्यक्रम घेण्यात आला.
 
 
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. प्रफुल्ल चौहान, आमदार राजू तोडसाम, माजी आमदार अण्णासाहेब पारवेकर उपस्थित होते. शनिवार, 8 नोव्हेंबरला यवतमाळ शहर युवा मोर्चाची बैठक घेण्यात आली. सोमवार, 10 नोव्हेंबरला वणी, मारेगाव व झरी येथे युवा संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रवासात प्रत्येक ठिकाणी युवा कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
Powered By Sangraha 9.0