राज्यस्तर विदर्भ खो-खो पुरुष महिला स्पर्धा सुरू

09 Nov 2025 21:27:59
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
kho-kho : राज्यस्तर विदर्भ खो-खो पुरूष व महिला स्पर्धांना बुधवार, 5 नोव्हेंबर रोजी सुरवात झाली. अभ्यंकर कन्या शाळेच्या खोखो क्रीडांगणावर सकाळ व संध्याकाळी या दोन सत्रात होत असलेल्या स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉ. चंद्रजित जाधव, कार्यक्रमाचे अध्यक्ष अमरचंद दर्डा, उद्घाटक आमदार बाळासाहेब मांगुळकर, वाशिमचे जिल्हा क्रीडा अधिकारी किशोर बोन्डे, नानासाहेब चव्हाण, संजय इंगळे, मोहन गांधी, नवजयहिंद क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनायक बोदडे, उप्पाध्यक्ष बाळासाहेब दौलतकार, संध्या वानखडे, कविता बोदडे, प्राचार्य डॉ. जयंत चतुर, प्रा. विकास टोणे, अरविंद घावडे यांच्या उपस्थितीत पार पडले.
 
 
y9Nov-Kho-Kho
 
स्पर्धेत महिलासंघ व पुरुष संघ असे विदर्भातील 29 संघ सहभागी झाले आहे. उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्तविक अविनाश जोशी यांनी केले. संचालन कैलास राऊत यांनी केले. स्पर्धेच्या प्रो खोखो आयोजनाकरिता मंडळाचे अमोल बोदडे, प्रदीप वानखडे, जम्मू लालूवाले, पंकज रोहणकर, अमोल ढोणे, संजय बट्टावार, आजी माजी वरिष्ठ खोखो खेळाडूसह नव जयहिंद क्रीडा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य परिश्रम घेत आहे.
Powered By Sangraha 9.0