देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक स्थगित

01 Dec 2025 13:46:41
देऊळगाव राजा, 
municipal-council-elections-postponed निवडणूक आयोगाच्या एका निर्देशानंतर हा दिनांक 30 नोव्हेंबर रोजीदेऊळगाव राजा सार्वत्रिक निवडणुकीला विश्रांती मिळाली असून येणाऱ्या दि२ डिसेंबर रोजी होणारी मतदान प्रक्रिया आता दिनांक 20 डिसेंबर रोजी घेण्यात येणार आहे . निवडणुकीत रिंगणात उभे असलेले उमेदवार व कार्यकर्ते यांना तात्पुरती विश्रांती मिळाली आहे .
 

municipal-council-elections-postponed 
 
देऊळगाव राजा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नामांकन अर्ज संदर्भात एका महिला उमेदवाराने नगराध्यक्ष पदाचे उमेदवारी अर्ज भरले होते या महिलेने जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अपीलच्या अनुषंगाने निवडणूक आयोगाने सदर आदेश पारित केले असून देऊळगाव राजा नगरपरिषद निवडणूक ला स्थगिती दिली व निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. municipal-council-elections-postponed या आदेशानुसार दिनांक १० डिसेंबर रोजी नामांकन अर्ज परत घेणे , दिनांक 20 डिसेंबर रोजी मतदान व दिनांक 21 डिसेंबर रोजी मतमोजणी घेण्याचे निर्देश आहे निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे नगराध्यक्ष पदाच्या 3 उमेदवारासह 21 नगरसेवक पदासाठी निवडणूक प्रचारात मग्न असलेल्या एकूण 77 उमेदवाराला मन:स्ताप सहन करावा लागला आहे याबरोबर उमेदवारासह असंख्य कार्यकर्त्यांच्या उत्साहावर विरजण पडले आहे निवडणूक प्रचाराला तात्पुरती विश्रांती मिळाली आहे
Powered By Sangraha 9.0