मुंबई,
Funeral in a hurry- Hema Malini बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांच्या निधनानंतर त्यांच्या अंतिम संस्कारांमध्ये झालेल्या घाईबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. लाखो चाहत्यांनीही नाराजी व्यक्त केली होती की त्यांना अंतिम दर्शनाची संधीच मिळाली नाही. पण आता या गोष्टीमागील कारण स्वतः हेमा मालिनी यांनी स्पष्ट केले असून त्यांची ही माहिती चित्रपट निर्माते हमाद अल रायमी यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे समोर आली आहे.
हमाद यांनी धर्मेंद्र यांच्या निधनानंतर तिसऱ्या दिवशी हेमा मालिनी यांना भेट दिली. त्यावेळी त्यांच्यात झालेली संवादाची कथा त्यांनी उर्दूत लिहिलेल्या आपल्या पोस्टमधून शेअर केली. भेटीत धर्मेंद्र यांच्या अंत्यसंस्कारात घाई का करण्यात आली याचे कारण हेमा मालिनी यांनी उघड केले. हेमा मालिनी यांच्या म्हणण्यानुसार, धर्मेंद्र यांनी आयुष्यात नेहमीच स्वतःला दमदार, उत्साही आणि लोकांच्या प्रेमाचा केंद्रबिंदू म्हणून जगले. त्यांना कधीच चाहत्यांनी किंवा कोणत्याही व्यक्तींनी त्यांना कमकुवत, आजारी किंवा वेदनेत पाहावे असे वाटत नव्हते. शेवटच्या काळात त्यांच्या प्रकृतीत मोठी घसरण झाली होती आणि ते खूप त्रासात होते. हेमा मालिनी यांच्या शब्दात धर्मेंद्रजींना त्यांच्या चाहत्यांनी त्या अवस्थेत पाहणे त्यांना मान्यच नव्हते. त्यांनी आयुष्यभर स्वतःचा सन्मान जपला. शेवटच्या क्षणी तो तुटू नये, अशी आमची इच्छा होती. या स्पष्टीकरणानंतर आता हे स्पष्ट झाले आहे की धर्मेंद्र यांच्या अंतिम संस्कारात गती देण्यामागील कारण भावनिक आणि वैयक्तिक होते. कुटुंबाने त्यांची प्रतिमा तशीच अबाधित राहावी यासाठी हा निर्णय घेतला.