मुंबई,
Nat Samrat Bal Gandharva Award प्रसिद्ध मराठी अभिनेता सिद्धार्थ जाधव यांचा ‘नटसम्राट बालगंधर्व कला रत्न’ पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे. त्यांच्या कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा सन्मान ‘साईदिच्छा प्रतिष्ठान’ आयोजित २५व्या नटसम्राट बालगंधर्व पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला. हा कार्यक्रम आज यशवंत नाट्यमंदिर, माटुंगा, मुंबई येथे पार पडला.
पुरस्कार स्वीकारताना सिद्धार्थ जाधव भावूक झाले. ते म्हणाले, “मी माझ्या मुलीसोबत इथे आलो आहे. तिच्या सोबत हा पुरस्कार स्वीकारून मला खूप आनंद झाला आहे. २००९ ला मला युवा बालगंधर्व कडून पुरस्कार मिळाला होता. मी २००० साली माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली होती. आज पंचवीस वर्षे झाली मी मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम करतोय. त्यामुळे हे वर्ष खूप महत्त्वाचे आहे. हा पुरस्कार मिळणे ही खूप मोठी गोष्ट आहे.”
पुरस्कार समारंभात बोलताना त्यांनी पुढे सांगितले, “आज मोठ्या दिग्गजांच्या समोर पुरस्कार स्वीकारण्याचा योग आला, मला खूप चांगलं वाटलं. हे पुरस्कार पुढे काहीतरी करण्याची ताकद देतात. मालिका ते सिनेमा पर्यंत पोहोचण्याचा प्रवास आणि उभे राहण्याची ताकद हे नाटकांनी आम्हाला दिली. चेहरा नसलेल्या कलाकारांना रंगभूमीने चेहरा दिला.”
मुंबई की बॉम्बे या चर्चेवर त्यांनी स्पष्ट मत व्यक्त केले: “मुंबईला मी मुंबई म्हणणार, मी मुंबईत राहतो आणि मी मुंबईच बोलणार.” प्रदूषणासंदर्भातही त्यांनी विचार मांडला. ते म्हणाले, “प्रदूषणासह महाराष्ट्रात आणखी काही प्रश्न आहेत. मी व्यसनमुक्तीचा ब्रँड अँबेसिटर आहे. युवक मोठ्या प्रमाणात व्यसन करतात आणि ते कमी झालं पाहिजे.”
हा कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, अभिनेते मकरंद देशपांडे, मुरली शर्मा, सई ताम्हणकर, भाऊ कदम, गायक कुमार सानू, सोनू निगम, आमदार मैथिली ठाकूर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मंत्री भरतशेठ गोगावले, दत्तात्रय भरणे, प्रताप सरनाईक, आमदार धनंजय गाडगीळ, आमदार प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक कवी, अभिनेते आणि राजकीय नेते उपस्थित होते.
मोकाट कुत्र्यांचा हल्ल्यात ३८,७१० नागरिक जखमी