ओमो,
The terrifying but unique Mursi इथिओपियाच्या ओमो खोऱ्यातील मुर्सी जमात ही जगातील सर्वात भयानक आणि अनोख्या संस्कृतींपैकी एक मानली जाते. ही जमात आफ्रिकेतील नैऋत्य भागात राहते आणि दक्षिण सुदान व केनियाच्या सीमेजवळील प्राचीन सांस्कृतिक समुदायांमध्ये मोडते. त्यांच्या भटकंती जीवनशैलीमुळे आणि कठोर परिस्थितींमुळे, मुर्सी लोकांना आक्रमक आणि साहसी मानले जाते. पाणी आणि कुरणाच्या शोधात सतत फिरणारी ही जमात शेजारच्या जमाती व सरकारशी असलेल्या संघर्षांमुळे अत्यंत योद्धा संस्कृती विकसित केली आहे, ज्यामुळे त्यांना त्यांच्या संसाधनांचे आणि जमिनीचे रक्षण करण्याची पूर्ण परवानगी आहे. गावांमध्ये बंदुका, शरीरावर जखमा आणि अनोखी सजावट सामान्य गोष्टी आहेत, तरीही ते कोणावरही अनावश्यक हल्ला करत नाहीत आणि आदिवासी कायद्यांचे पालन करतात.
मुर्सी महिलांची लिप-प्लेट परंपरा त्यांच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. खालच्या ओठांवर मोठ्या प्लेट घालणे प्रजननक्षमता आणि विवाहयोग्यतेचे प्रतीक मानले जाते. ही परंपरा बाहेरच्या लोकांना भयानक वाटू शकते, पण जमातीतील सामाजिक ओळखीचा आणि विवाहासाठी आवश्यक असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. मुर्सी लोक बाह्य संस्कृतीपासून अलिप्त राहतात, ज्यामुळे त्यांची कठोर जीवनशैली कायम राहते. त्यांची उंच, पातळ बांधणी आणि आक्रमक स्वभावही त्यांना भयावह बनवतो.
मुर्सी पुरुषांची रक्तपिण्याची प्रथा देखील त्यांच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. ते ताजे गाय व बकरीचे रक्त पितात, ज्याला ते ऊर्जा, शक्ती आणि जीवनाचे प्रतीक मानतात. हे रक्त लढाई, लांब प्रवास आणि धार्मिक विधींमध्ये घेतले जाते. या प्रथेतून त्यांची सांस्कृतिक ओळख आणि आध्यात्मिक श्रद्धा स्पष्ट होते. महिलांनी ओठांवर घाललेल्या अंगठ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर वारंवार व्हायरल होतात, तर पुरुषांच्या रक्तपिण्याचे व्हिडिओ बाह्य लोकांना दाखवले जात नाहीत.
मुर्सी जमाती आध्यात्मिकदृष्ट्या "तुमवी" नावाच्या देवतेचा आदर करतात, ज्याला जागा आणि शक्तीचा सर्वोच्च स्रोत मानले जाते. ते निसर्ग आणि त्यांच्या पूर्वजांच्या आत्म्यांचा आदर करतात. त्यांच्या आहारात मुख्यत्वे ज्वारी, कॉर्न दलिया, दूध आणि रक्त असते, तर मांस फक्त विशेष प्रसंगी किंवा कठीण परिस्थितीत खाल्ले जाते. ही कठोर जीवनशैली, प्राचीन परंपरा आणि भयानक वाटणारी आचारसंहिता असूनही, मुर्सी जमाती त्यांच्या संस्कृती, ओळख आणि परंपरांचा अत्यंत आदर करतात.