ट्रेकिंग अपघाताचा धक्कादायक व्हीडिओ....

01 Dec 2025 14:26:34
बीजिंग,
Trekking accident video सोशल मीडियावर धक्कादायक ट्रेकिंग अपघाताचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चीनच्या एका डोंगर टेकडीवर काही ट्रेकर्स पायऱ्या उतरवत होते, जेथे समोर धोकादायक दरी होती. काळजीपूर्वक पायऱ्या उतरतानाही एका ट्रेकरचा तोल गेला आणि तो थेट दरीत पडला. व्हिडिओमध्ये दिसते की, काही लोक आरामात पायऱ्या उतरवत असताना अचानक माणूस घसरतो. त्याच्या मागे असलेले ट्रेकर्सही धक्कात पडतात. ही हृदयद्रावक घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, पाहणाऱ्यांचे हृदय थरथरले.
 
 
VIDEOAS
 
सुदैवाने, दरीत पडताना एका झाडाने त्याचा पडण्याचा वेग थांबवला आणि त्याचा जीव वाचवला. मात्र, त्याला गंभीर दुखापत झाली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात शेअर होत असून, लोक त्यावर आपले विचार आणि प्रतिक्रिया देत आहेत. हा प्रकार ट्रेकिंगदरम्यान सुरक्षिततेवर अधिक लक्ष देण्याची गरज अधोरेखित करतो.
 
 
Powered By Sangraha 9.0