देवव्रत रेखे यांना 'वेदर्षि' पुरस्कार

01 Dec 2025 13:51:45
नागपूर,
Vedarshi Award वेद-शास्त्र परंपरेतील अलौकिक कार्यासाठी नागपूरमधील निगमकल्पतरु गुरुकुल यांच्यावतीने सुरू केलेल्या 'वेदर्षि' पुरस्काराचे पहिले मानकरी ठरण्याचा सन्मान १९ वर्षीय देवव्रत रेखे (अहिल्यानगर) यांना मिळाला. हा सन्मान श्रीक्षेत्र काशी, वल्लभराम शालिग्राम सांगवेद विद्यालय येथे प्रदान करण्यात आला.
 
 

Vedarshi Award
 
अहिल्यानगर येथील वैदिक विद्वान महेश रेखे यांचे सुपुत्र देवव्रत रेखे यांनी वयाच्या फक्त १९ वर्षांत शुक्लयजुर्वेद मध्यंदिन संहितेचे संपूर्ण सस्वर दंडक्रम पारायण केले. Vedarshi Award त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळेच ते या प्रतिष्ठित पुरस्कारासाठी पात्र ठरले.
नागपूरचे ज्येष्ठ वैदिक विद्वान आणि निगमकल्पतरु गुरुकुल चे संस्थापक गणेशशास्त्री जोशी व सर्वेश जोशी यांच्या हस्ते देवव्रत रेखे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. Vedarshi Award पुरस्कारात रोकड ११,००० रुपये, 'वेदर्षि' पदवी, सम्मानपत्र आणि महावस्त्र समाविष्ट होते. सोहळ्यात वैदिक विद्वान निलेश केदार, देवेंद्र गढीकर, शेखर द्रविड यांच्यासह अनेक प्रतिष्ठित विद्वान उपस्थित होते.
'वेदर्षि' पुरस्काराची सुरुवात याच वर्षी करण्यात आली असून, वेद-शास्त्र विषयात प्रामाणिक आणि अलौकिक कार्य करणाऱ्या विद्वानांचा गौरव करणे आणि प्रोत्साहन देणे हा या पुरस्काराचा मुख्य उद्देश आहे. Vedarshi Award देवव्रत रेखे यांच्या या ऐतिहासिक कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सौजन्य: सर्वेश जोशी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0