किडनी रुग्णांसाठी जागरूकता कार्यक्रम

10 Dec 2025 17:10:09
नागपूर,
kidney patients माइंड पार्क फाउंडेशन यांच्या वतीने ८४ माधव नगर येथे “दीर्घकालीन आजारांमध्ये कुटुंबियांची भूमिका” या विषयावर विशेष जागरूकता कार्यक्रम आज पार पडला. कार्यक्रमात पत्रकार दाम्पत्ये सौ. वर्षा वेलणकर आणि चंद्रशेखर वेलणकर यांनी निदान (Diagnosis) आणि किडनी आजारांशी संबंधित माहिती सखोल दिली. त्यांनी योग्य आणि वेळेवर केलेले निदान, मानसिक आरोग्याची काळजी, केअरगिव्हिंग टिप्स आणि जीवनशैली सुधारण्याचे मार्गदर्शन उपस्थितांना दिले.
 
kidney patients
 
वेलणकर दाम्पत्यांनी सांगितले की, किडनी रुग्णांना मोफत मदत देण्यासाठी त्यांनी २०२४ मध्ये सोबती सेवा फाउंडेशन स्थापन केले आहे. kidney patients तसेच, ‘सोबती’ या पुस्तकातून टर्मिनली-इल्ल रुग्णांच्या केअरगिव्हिंग अनुभव शेअर केले आहेत. कार्यक्रमात डॉ. स्वाती धर्माधिकारी, मानसशास्त्रज्ञ, विशेष उपस्थित होत्या, तर सहभागी प्रश्नोत्तर सत्राद्वारे शंका निरसन करत कार्यक्रम संपन्न झाला.
 
सौजन्य: अभय चोरघडे, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0