भाव तसा देव ही संतांची वाणी : ध्रुव पटवर्धन

10 Dec 2025 17:53:27
तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Dhruv Patvardhan, सुलतनशाही, मोगलशाहीचं ग्रहण ! सनातन संस्कृती नष्टकरण्याचं ग्रहण ! दुर्जनांचा नाश, दुष्प्रवृत्तीचा नाश करणाèया प्रभूरामचंद्रांच्या मूर्तीना गर्भगृहात खितपत पडावं लागलं असं महाग्रहण. म्हणतात नां, ग्रहण काही काळच असतं ग्रहण संपलं आणि देव आहे ही संल्कल्पना दृढ झाली. संतांनी मार्गदाखविला. संत म्हणतात.., राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘भाव तसा देव ही संतांची वाणी, भाव दृढ करा..!’ असे प्रतिपादन धृव पटवर्धन यांनी केले.
 

Dhruv Patvardhan, 
अहो सदाशिवा ! देसी भुक्ती मुक्ती भावा । हा संतश्रेष्ठ नामदेवरायाचा अभंग त्यांनी निरूपनासाठी सादर केला. त्यांचे स्वागत अरूण भिसे यांनी केले. तबला वादक सचिन वालगुंजे, संवादिनी वादक चंद्रकांत राठोड यांचे स्वागत डॉ. सुशील बत्तलवार यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन किशोरी केळापूर यांनी केले.ते पुढे म्हणाले, देव आहे का, आहे तर कसा आहे? या प्रश्नावर साधक बाधक चर्चा झाल्या..., होत आहे..., होत राहणार. देव आहे ही संकल्पना इसविसन पूर्व 5 हजार वर्षापूर्वी सुद्धा होती. त्रेतायुगात श्रीराम, द्वापार युगात श्रीकृष्ण आणि हल्लीच्या कलीयुगात संत हेची देवही संकल्पना दृढ झाली. समर्थ म्हणतात, ‘पृथ्वीमाजी जितुकी शरीरे, तितुकी भगवंताची घरे । महासुखे येणे द्वारे प्राप्त होती, असे म्हणतात. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे व भारत ही देवभूमी आहे. विश्वगुरू पदावर भारत हा पूर्वीही होता आणि आजही आहे, आणि राहणार असा दृढविश्वास सद्यातरी निर्माण झालेला आहे.
उत्तरार्धात कीर्तनकारांना Dhruv Patvardhan, मोहन भुजाडे यांनी माल्यार्पण केले. दुष्पवृत्तींनी देवांना सुद्धा त्रास देणारे महाभाग व त्यावर मात करणारी सत्प्रवृत्ती याचं एकमेव उदाहरण म्हणजे अयोध्या मंदीर निर्मिती होय. असे भाष्य करतांना त्यांनी कारसेवा अभियान स्वरचित दिंडी, आर्या सादर करून नाविण्यपूर्ण आख्यान सादर केले. आधी लगिन कोंडाण्याचं असे म्हणणारे तानाजी मालूसरे याचं बलीदान जसं अंगावर शहारे आणतात. तसेच अंगावर काटे उभे करणारे रामभक्त राम व शरद कोठारे बंधुंनी सुद्दा आधी मंदिर रामारायाचं नंतर लग्न बहिणीचं असं घोष वाक्य उच्चारून कारसेवेत भाग घेतला व हौतात्म पत्करलं बलीदान दिलं. धन्य धन्य ते कोठारे बंधू असे भावपूर्ण उद्गार काढून त्यांनी आपल्या कीर्तनाची सांगता केली. आरतीचे यजमानपद तायवाडे, उषा अरू, कैलास पुरी, प्रकाश दिघाडे, प्रशांत पांडे, सुधाकर चव्हाण यांनी भूषविले.
Powered By Sangraha 9.0