विश्वकल्याणासाठी भारतीय संस्कृती

10 Dec 2025 17:05:25
नागपूर,
Kavikulguru Kalidas Sanskrit University कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक अभ्यास केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “संस्कृत आणि संस्कृती भविष्यासाठी पथप्रदर्शक- परिप्रेक्ष्यातील बदल” या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र रामटेक येथे घेण्यात आला. मुख्य वक्ते म्हणून प्रो. यशवंत पाठक (University of South Florida, USA) यांनी भारतीय संस्कृती ही “विश्वकल्याणाचा आधार आणि सर्वसमावेशक मूल्यव्यवस्था असलेली प्रगल्भ संस्कृती” असल्याचे सांगितले. संस्कृत आणि संस्कृती हे भविष्यासाठी दिशा देणारे घटक असून त्याकडे नवीन दृष्टीकोनातून पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
 
Kavikulguru Kalidas Sanskrit University
 
कार्यक्रमात प्रो. अमरजीव लोचन (दिल्ली विश्वविद्यालय) यांनी संस्कृत भाषेचे मूळ अर्थ समजण्यासाठी असलेले महत्त्व स्पष्ट केले. डॉ. शाम कोरेटी यांनी आदिवासी समाजाचे ज्ञान आणि शाश्वत विकासातील योगदान अधोरेखित केले. अध्यक्षीय भाषणात प्रो. कविता होले म्हणाल्या, “भारतीय संस्कृती ही मूल्ये, विवेक, वैज्ञानिक दृष्टी आणि मानवतेची त्रिसूत्री प्रदान करणारी शक्ती आहे. याच आधारावर विकसित भारताची निर्मिती शक्य आहे.” Kavikulguru Kalidas Sanskrit University कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रो. प्रसाद गोखले यांनी केले. संचालन प्रा. सिमरन ठाकूर यांनी तर विद्यार्थ्यांच्या चर्चासत्राचे नेतृत्त्व संदीप कविश्वर यांनी केले. चर्चासत्राला विद्यार्थी, अधिष्ठाता, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सौजन्य: अनघा आंबेकर, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0