११ डिसेंबरला पद्मश्री निवेदिता भिडे यांचे व्याख्यान

10 Dec 2025 18:58:51
नागपूर ,
Nagpur University राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिंदी विभागात गुरुवार, ११ डिसेंबर रोजी सकाळी ११:३० वाजता “भारतीय संस्कृती: आव्हाने आणि शक्यता” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कन्याकुमारी येथील विवेकानंद केंद्राच्या अखिल भारतीय उपाध्यक्षा पद्मश्री निवेदिता भिडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.
 
 

nivedita 
 
 
हिंदी विभाग प्रमुख डॉ. मनोज पांडे यांनी प्राध्यापक, Nagpur University संशोधक व नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
सौजन्य:लखेश चंद्रवंशी,संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0