मानवतेच्या संदेशासाठी हिंगणी येथे उद्या सेवक संमेलन

10 Dec 2025 19:27:31
सेलू, 
sevak-sammelan : मानवी मूल्ये, सेवा, सदाचार व बंधुभावाचा संदेश समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा या उद्देशाने जुमदेव बाबा परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर नागपूर यांच्या संयुक्त वतीने मानव धर्माचे सेवक संमेलन उद्या गुरुवार ११ रोजी हिंगणी येथील शिवणगाव रोडवरील सेवक गेट क्रमांक ११ येथील प्रांगणात आयोजित करण्यात आले आहे.
 
 
 
WARDHA
 
 
 
या कार्यक्रमात मानवधर्माची शिकवण, सेवाभाव, नैतिक मूल्ये तसेच सामाजिक एकोपा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. परिसरातील सेवक, सेविका, महिला, युवक तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने या संमेलनात सहभागी होणार आहेत. या मंडळाचे पदाधिकारी, ज्येष्ठ सेवक, सेविका तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी मान्यवरांकडून मानवधर्माचे महत्त्व, सेवा आणि समाजहितासाठी एकत्र येण्याचा संदेश दिला जाणार आहे. या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक बबन लोणकर, शुभम लोणकर, प्रज्वल लटारे, आदी सेवकांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0