लाडकी बहीणसाठी मोठी बातमी...लवकरच येणार ३ हजार!

11 Dec 2025 12:05:40
नागपूर,
big-news-for-ladaki-bahin महाराष्ट्र सरकारच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजनेअंतर्गत राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच ३००० रुपये जमा होणार आहेत. या रकमेत नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन महिन्यांच्या हप्त्यांचा समावेश असेल. महापालिका निवडणुकीपूर्वी हा निर्णय महायुती सरकारकडून घेतल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अनुकूल वातावरण तयार होण्याची शक्यता आहे, असे राजकीय विश्लेषकांनी सांगितले.
 
 
ladki bahin yojana
 
योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसीची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. आतापर्यंत २ कोटी ४३ लाख महिलांनी रजिस्ट्रेशन केले असून, या प्रक्रियेत बोगस अर्ज किंवा त्रुटी टाळण्यासाठी सरकार खबरदारी घेते आहे. उपमुख्यमंत्री आणि महिला विकास मंत्री आदिती तटकरे यांनी विधानसभेत सांगितले की, 'लाडकी बहीण योजना अजिबात बंद होणार नाही आणि योग्य वेळी लाभार्थींना २१०० रुपये दिले जातील.' यामुळे महिलांना आर्थिक मदत मिळेल आणि योजनेचा फायदा स्थानिक निवडणुकीतही दिसून येईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महापालिका आणि नगरपरिषदेच्या निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होतील. या पार्श्वभूमीवर सरकारने हप्त्यांचे वितरण नियोजनबद्ध पद्धतीने करीत असून, लाभार्थी महिलांना एकत्रित रक्कम मिळवून त्यांचा आनंद वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवलं आहे.
Powered By Sangraha 9.0