आमदार, खासदारांच्या घरावर बिबटे सोडा

11 Dec 2025 16:15:13
पुणे,
Bacchu Kadu विदर्भातील ग्रामीण भागात बिबट्यांच्या वाढत्या हालचालींमुळे लोकांच्या जीवनात दहशत पसरली आहे. अनेकांनी वन्यप्राण्यांच्या हल्ल्यामुळे घाबरलेले आहेत, तसेच प्रशासनाकडून योग्य तोडगा न मिळाल्याचे संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रहारचे नेते बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे.
 

Bacchu Kadu 
कडू म्हणाले की, “हजार बिबट्यांचा बंदोबस्त करू शकत नाही, जाऊ तिथं खाऊ असे सरकार आहे.” त्यांनी स्पष्ट केले की, जोपर्यंत बिबट्या एखाद्या आमदार किंवा खासदाराच्या घरात शिरत नाही, तोपर्यंत शासनाला परिस्थितीची गंभीरता लक्षात येत नाही. ग्रामीण भागातील नागरिकांच्या दहशतीला प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, वनविभागाकडून घेतल्या जाणाऱ्या कारवायांवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले.बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरही तीव्र टीका केली. चालू वर्षीच्या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या उद्ध्वस्त झाला आहे, असे सांगत त्यांनी कर्जमाफीसाठी तातडीची मागणी केली. त्यांनी सवाल उपस्थित केला, “मरणारा शेतकरी हिंदू नाही का?” तसेच, कर्जमाफीची प्रक्रिया योग्यरित्या केली गेली नाही, तर विदर्भातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रात रेल्वे थांबवण्याचा इशारा दिला.
 
 
जोरदार टोला!
यावेळी त्यांनी प्रवीण Bacchu Kadu परदेशी आणि रवी राणा यांच्यावरही टीका केली. परदेशी यांच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करत त्यांनी चौकशीची मागणी केली, तर रवी राणांच्या विधानाचा संदर्भ देत त्यांनी म्हटले, “असे पाळणारे भरपूर आहेत…तुम्ही किल्ले उडवण्यात दंग आहात, पण इथे शेतकरी रोज मरतोय.”ईव्हीएम मशीनसंबंधी देखील बच्चू कडू यांनी गंभीर आरोप केले. त्यांनी दावा केला की, “१५ ते २० टक्के ईव्हीएममध्ये घोळ आहे,” आणि पारदर्शक मतदानासाठी बॅलेट पेपरकडे परतण्याची मागणी केली. “रामभक्त असाल तर बॅलेटवर या,” असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.तसेच, राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेवर कडू यांनी तीक्ष्ण प्रतिक्रिया दिली. “दोन्ही पक्ष एकत्र येऊन काय भलं होणार शेतकऱ्याचं? ते फक्त सत्तेसाठी एकत्र येतात; शेतकऱ्यांसाठी नाही,” असे ते म्हणाले आणि शरद पवार व अजित पवार यांच्या नेतृत्वावर प्रश्न उपस्थित केले.विदर्भातील बिबट्यांच्या हल्ल्यांपासून शेतकऱ्यांच्या संकटापर्यंत, ईव्हीएमवरील आरोपापर्यंत, बच्चू कडू यांनी सरकारवर आणि प्रशासनावर कठोर शब्दांत निशाणा साधला आहे. या विधानामुळे राजकीय चर्चांना नव्या वळणाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
Powered By Sangraha 9.0