माझी बायको दुसऱ्यासोबत हॉटेलच्या खोलीत जाते! VIDEO

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वाराणसी,
man suicide in Varanasi उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये ३० वर्षीय तरुणाने कौटुंबिक वाद आणि मानसिक तणावातून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत तरुणाने मृत्यूपूर्वी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यात पत्नी व तिच्या मित्राविरुद्ध गंभीर आरोप केल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतकाच्या म्हणण्यानुसार त्याची पत्नी इतर पुरुषांसह हॉटेलमध्ये जाते. मृत तरुणाचे नाव राहुल मिश्रा असून तो लोहटा परिसरातील बनकट गावात राहत होता. घरातच त्याचा मृतदेह आढळल्याने कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती देताच तपासाला सुरुवात झाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
 
 
 
sudide
राहुलच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्याची पत्नी, तिचा कथित मित्र आणि तिची आई यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवला आहे. राहुलने सुमारे पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. तपासादरम्यान पोलिसांना राहुलच्या मोबाईलमध्ये ७ मिनिटांचा व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये त्याने पत्नीने स्वतःला फसवल्याचा, मुलाला भेटू न दिल्याचा आणि मानसिक त्रास दिल्याचा दावा केला आहे. आर्थिक अडचणी आणि वाढत्या तणावामुळे तो अत्यंत अस्वस्थ झाला होता, असेही त्याने सांगितले.
 
 
राहुलने मुलाला भेटण्यास अडथळे येत असल्याची तक्रार व्हिडिओमध्ये मांडली आहे. तसेच स्वतःवर झालेल्या कथित तक्रारी, कौटुंबिक तणाव आणि नात्यातील विसंवाद यामुळे तो तणावाखाली असल्याचे नमूद केले आहे. या व्हिडिओमध्ये राहुलने पुरुषांवरील शोषणाविषयी कायद्यांमध्ये बदल करण्याची मागणीही केली आहे. कौटुंबिक संघर्षांत पुरुषांच्याही बाजूला संरक्षण मिळायला हवे, असे त्याचे मत होते. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे. कुटुंबीयांचे जबाब, मोबाईल रेकॉर्ड, तक्रारी आणि डिजिटल पुरावे यांची पडताळणी सुरू असल्याचे समजते.