असंघटित कामगारांच्या मुलांची सुरक्षा वार्‍यावर

11 Dec 2025 17:28:17
मानोरा,
migrant labour issues Manora, तालुयातील ग्रामीण भागातील तांडे व असंख्य आदिवासी पाड्यांमधून दिवाळी संपताच असंख्य कामगार ऊस तोडीसाठी, वीटभट्ट्यांवरील कामा करिता आणि अकुशल बांधकाम कामगार म्हणून राज्य व देशातील अनेक प्रांतामध्ये हंगामी रोजगारासाठी स्थलांतरित झाले असून, या कामगारांची शालेय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांचे शिक्षण सुद्धा धोयात असून सुरक्षा सुद्धा वार्‍यावर असल्याचे त्यांच्या लहानगे त्यांच्यासोबत वावरत असल्याने पुढे येत आहे.
 

migrant labour issues Manora, 
राज्य,राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या पुलाच्या बांधकामस्थळी कामगारांच्या लहान मुलांचा वावर वाढल्याचे समोर आले आहे. तालुयातील एक असलांतरीत मजुराचा लहान मुलाला बांधकामस्थळाच्या मातीच्या ढिगार्‍यावर उभे असताना पाहायला मिळत असून, त्याच्या नजीकच काही कामगार कठोर उन्हात काम करीत असून हे या चिमुकल्याचे आई-वडील आहेत. या परिसरात लोखंडी सळया, सिमेंटचे साचे, तीक्ष्ण बांधकाम साहित्य आणि खोल खंदक असल्यामुळे मुलांसाठी गंभीर अपघाताचा धोका कायम असतो. सुरक्षित बाल-देखभालीची सुविधा नसल्यामुळे मजुरांना आपल्या मुलांना त्याच ठिकाणी ठेवण्याशिवाय पर्याय नसल्याचे पालकांनी प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले. अस्थाई व स्थलांतरित कामगारांच्या मुलांसाठी सुरक्षित जागा, शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्याची नितांत गरज सध्याच्या थंडीच्या काळात निर्माण झालेली आहे.
सामाजिक कार्यकर्त्यांनीही migrant labour issues Manora, या समस्येला दुर्लक्ष करता येणार नसल्याचे सांगून ऊस तोडीसाठी ज्या कारखान्याकडे हे मजूर काम करतात त्या कारखाना प्रशासनाने, वीटभट्टी उद्योगाने आणि बांधकाम कंपनींनी कामगार, सुरक्षा नियमांचे पालन व बालसुरक्षा उपाय तात्काळ राबवावेत असे आवाहन केले आहे.सरकारी कामांमध्ये कामगारांच्या कुटुंबीयांसाठी सुविधा देण्याचे नियम असतानाही प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नसल्याचे स्पष्ट होत आहे. प्रशासनाकडून या ठिकाणी तपासणी होऊन योग्य ती कारवाई करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Powered By Sangraha 9.0