शत्रुघ्न सिन्हा म्हणाले जया बच्चन 'खामोश'

11 Dec 2025 11:58:49
मुंबई,
shatrughan sinha बॉलिवूड अभिनेत्री आणि राज्यसभेच्या सदस्या जया बच्चन पुन्हा एकदा त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. पापाराझींवर वारंवार संताप व्यक्त करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या जया बच्चन यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी पापाराझींच्या पोशाखाविषयी उपरोधिक वक्तव्य करत त्यांच्या शिक्षण आणि पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित केले होते. यामुळे नेटिझन्सनी त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले.
 

shatrughan sinha 
या घटनेवर आता बॉलिवूड अभिनेते आणि दिग्गज नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी अप्रत्यक्षरित्या प्रतिक्रिया नोंदवली आहे. अलीकडेच एका सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी झालेल्या सिन्हा यांनी कोणाचेही नाव न घेता, परंतु स्पष्ट संकेत देत जया बच्चन यांच्या वक्तव्यावर प्रहार केल्याचे दिसून आले. उपस्थितांना संबोधित करताना ते म्हणाले, “तुम्ही सगळे चांगले दिसता… चांगल्या पँट घालता आणि चांगले शर्टही घालता.” त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून नेटिझन्स विविध प्रतिक्रिया देत आहेत.
 
 
जया बच्चन यांनी shatrughan sinha नुकत्याच एका कार्यक्रमात पापाराझींशी त्यांच्या नातेसंबंधाबाबत विचारलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया देताना काही पत्रकारांचे कपडे व वर्तन यावर टीका केली होती. “मी मीडियामधून आलेली आहे. माझे वडील पत्रकार होते, त्यामुळे माध्यमांचा मला खूप आदर आहे. पण बाहेर उभे असलेले घाणेरड्या पँट घातलेले, स्थानिक मोबाईल घेऊन फोटो काढणारे लोक… त्यांना वाटतं की ते नको त्या कमेंट करू शकतात. कोणत्या प्रकारची माणसं आहेत ही? कुठून येतात, शिक्षण काय आहे?” असे ते म्हणाल्या होत्या.ही पहिली वेळ नाही की जया बच्चन पापाराझींवर नाराजी व्यक्त करताना वादात सापडल्या आहेत. यापूर्वीही त्यांच्या आक्रमक प्रतिक्रियांमुळे त्या चर्चेत राहिल्या आहेत. काही जण त्यांच्या भूमिकेचे समर्थन करतात, तर अनेकजण त्यांना सार्वजनिक व्यक्तिमत्त्व म्हणून संयम राखण्याचा सल्ला देतात.या प्रकरणानंतर जया बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या अप्रत्यक्ष प्रतिक्रियांमुळे सोशल मीडियावर पुन्हा एकदा चर्चा रंगल्या आहेत. आगामी दिवसांत या वादाला आणखी कोणते वळण मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Powered By Sangraha 9.0