अनिल कांबळे
नागपूर,
umaid-women-protesters : कुपाेषितांच्या सेवेसाठी आणि त्यांच्या आराेग्याची काळजी घेण्यासाठी तत्पर असलेल्या उमेदमध्ये सेवा देणाऱ्या महिलाच आर्थिकदृष्ट्या कुपाेषित आहे. त्यामुळे आता तरी पाेटभर अन्नाची साेय करा, अशी आर्त हाक देत उमेदच्या महिलांनी गुरुवारी यशवंत स्टेडियम अक्षरशः दणाणून साेडले.
विदर्भातले मेळघाट, गडचिराेली, काेकणातले जव्हार, माेखाडा आणि खानदेशातले जळगाव, धुळे कुपाेषणामुळे शापित परिसर म्हणून ओळखल्या जाते. राज्याची या कुपाेषणाच्या कलंकातून मुक्ती व्हावी, यासाठी सरकारने उमेद ही महत्त्वाकांक्षी याेजना सुरू केली. मात्र, वास्तवात उमेदमध्ये सेवा देणारे मनुष्यबळ आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. शासनाने आखलेल्या कुपाेषण मुक्ती माेहिमेतून उमेदसाठी सेवा देणाऱ्या या महिला कर्मचारी संघटनांनी गुरुवारी साखळी उपाेषणात हाक दिली हाेती. उमेदमध्ये सेवा देणाऱ्या महिलांसाठी राज्य ग्रामीण जीवनाेन्नती अभियानाची स्वतंत्र चूल मांडावी. कंत्राटींना कायम स्वरुपी दर्जा द्यावा.
उमेदमधील गाव स्तरीय केडरला ग्रामसखी म्हणून मान्यता द्यावी, उमेद कर्मचारी नाेकरी पदाेन्नती प्रक्रिया पूर्ववत राबवा, अभियानांतर्गत समन्वयक, सहाय्यक कर्मचाऱ्यांची रिक्त पदे भरा, विनंतीनुसार जिल्हा बदली याेजना मान्य करा, अशा मागण्या करण्यात आल्या. आंदाेलनाला भरभरून प्रतिसाद देत राज्याच्या कानाकाेपèयातून हजाराेंच्या महिलांनी धडक दिली.
तान्ह्या बाळासह आई आंदाेलनात
मागण्या पूर्ण हाेऊन संसाराला हातभार लागावा म्हणून एक महिला तान्हुले बाळ कवेत घेऊन आंदाेलनात सहभागी झाली हाेती.उमेदमधून कुपाेषण मुक्तीसाठी झटत असलेल्या त्या मातेने बाळासह माेर्चात सहभाग घेतला. तर काही महिला कपड्यात गुंडाळलेल्या भाकरी हातावर घेऊन खाऊन मागण्या रेटून धरत हाेत्या.