वर्धेत उद्यापासून वर्धा क्रिकेट प्रीमियर लिग

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
wardha-cricket-premier-league : जय महाकाली शिक्षण संस्था संचालित अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने वर्धा प्रीमियर लीग सिझन : ६ चे आयोजन १२ ते २१ डिसेंबरपर्यंत सकाळी ११.३० ते रात्री १० वाजेपर्यंत करण्यात आले आहे. वर्धा प्रीमिअर लिगच्या धर्तीवर स्थानिक सर्कस ग्राउंड रामनगर येथे खेळवले जाणार आहेत.
 
 

K  
 
 
 
स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता ३१० खेळाडूंनी चाचणी दिली. त्यापैकी २४० खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. ऑशन पद्धतीने होणार्‍या या स्पर्धेकरिता संघमालकांनी स्वतः १५ खेळाडूंचा संघ निवडला. उद्घाटन समारोह १२ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे. स्पर्धेचे थेट प्रक्षेपण डब्ल्यूपीएल यू-ट्यूब चॅनल आणि टेनिस डॉट कॉम वर होणार आहे. जिल्ह्यातील नामवंत १० शाळांतील क्रिकेट संघाना सुद्धा आमंत्रित केले आहे. रामनगर सर्कस ग्राउंडमध्ये प्रेक्षकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. साखळी पद्धतीने ४९ सामने १० दिवस खेळविले जाणार आहेत सोबतच शालेय सामने खेळवले जाणार आहेत. क्रिकेट प्रेमींनी या सामन्याला उपस्थिती लावण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.