न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनिअसमध्ये तालुकास्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
वर्धा,
wardha-news : स्थानिक न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनिअस येथे पंचायत समितीच्या वतीने तालुका स्तरीय विज्ञान व शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे आयोजन विद्यालयाच्या परीसरात करण्यात आले होते.
 
 
IK
 
या प्रदर्शनात वर्धा तालुयातील शासकीय व अनुदानीत शाळांच्या उच्च प्राथमिक व उच्च माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. कार्यक्रमाचे उद्घाघाटन आज गुरुवार ११ रोजी झाले. यावेळी डायेटचे प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे यांची मुख्य अतिथी म्हणून उपस्थिती होती तर शिक्षणाधिकारी (माध्य.) डॉ. जयश्री घारफळकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभिये, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) ज्ञानेश्वर पानसरे, ज्येष्ठ व्याख्याता डॉ. रामभाऊ सोनारे, संस्थेचे सचिव अशोक गोयंका, सचिव प्रदीप बजाज यांची उपस्थिती होती. न्यू इंग्लिश अकॅडमी ऑफ जिनिअसचे प्राचार्य डॉ. देवेंद्र गुजरकर यांनी आयोजनाची जबाबदारी पार पाडली. डॉ. रामभाऊ सोनारे यांनी विज्ञान व शिक्षणाच्या नव्या आयामांवर मार्गदर्शन केले.