अनिल कांबळे
नागपूर,
bachchu-kadu : गाेसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूर व भंडारा जिल्ह्यातील शेकडाे आंदाेलनकर्त्यांनी आमदार निवासच्या थेट पाचव्या मजल्यावरील गच्चीवर आंदाेलन केले हाेते. या आंदाेलनाच्या सात वर्षांनंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी घेत प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष बच्चू कडू यांच्या विराेधात वाॅरंट जारी केला आहे. तसेच त्यांना गुरुवारी प्रत्यक्ष हजर राहण्याचे देखील आदेश दिले आहेत.
बच्चू कडू यांनी 20 ऑक्टाेबर 2018 राेजी आमदार निवासात प्रवेश करत, इमारतीला कुलूप लावण्याचा प्रयत्न केला हाेता. अचानक घडलेल्या या प्रकारानंतर प्रशासनाचे धाबेही दणाणले हाेते. महत्त्वाचे म्हणजे प्रहार गाेसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने विभागीय आयुक्त कार्यालयावर माेर्चा काढण्याची घाेषणा केली हाेती. सरकारने प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही प्रशासनाने त्याची अंमलबजावणी केली नाही, असा आराेप बच्चू कडू यांनी केला हाेता..