विधिमंडळात मंजूर होणारे कायदे समाजाच्या हिताचे

- आ.सुधीर मुनगंटीवार - विधानभवनात संसदीय अभ्यासवर्ग

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
नागपूर,
sudhir-mungantiwar : लोकशाहीत कायदे करण्याची कायदेमंडळाची प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे. सभागृहात मंजुरीसाठी सादर होणारे कायद्यांचे मसुदे सखोल अभ्यासानंतर केले जातात. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांच्या आशा, आकांशा पूर्ण होण्याची काळजी या मसूद्यातून घेतली जाते. सखोल अभ्यास आणि चर्चेनंतर मसुद्याचे कायद्यात रुपांतर होते, असे आ.सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
 

SUDHIR
 
विधानभवनात संसदीय अभ्यासवर्गात ‘कायदे निर्मितीची व या प्रक्रियेतील दोन्ही सभागृहाचे अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करतांना मुनगंटीवार बोलत होते. यावेळी विधानमंडळाच्या सचिव मेघना डॉ.विलास आठवले, विधानमंडळाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने उपस्थित होते. सुरुवातीस तळेकर यांनी मुनगंटीवार यांचा परिचय करुन दिला.
 
चांगला जनसंपर्क आवश्यक
 
 
महाविद्यालयात असतांना १९८८ मध्ये मी विद्यार्थी या नात्याने संसदीय अभ्यासवर्गात सहभागी होतो. लोकप्रतिनिधी म्हणून सभागृहात बसण्याची आकांक्षा त्या वर्गातून माझ्या मनात निर्माण झाली होती. काही वर्षातच विधानसभा सदस्य होण्याची मला प्राप्त झाली. अशीच संधी या वर्गात सहभागी विद्यार्थ्यांना मिळू शकते. त्यासाठी चांगला जनसंपर्क आणि त्यादृष्टीने प्रयत्न आवश्यक असतात, असे मुनगंटीवार म्हणाले.
 
प्रत्येक शब्दांवर चर्चा
 
 
कायद्याचा मसुदा सखोल अभ्यासानंतर केला जातो. मसुदा सभागृहासमोर सादर झाल्यानंतर त्यातील प्रत्येक शब्दांवर चर्चा केली जाते. काही सदस्य कलमांवर तासनतास अभ्यासपूर्ण मते मांडतात. कायदेमंडळाने मंजूर केल्यानंतर तो अंतिम मंजुरीसाठी राज्यपालांना सादर केला जातो. राज्यपालांच्या मंजुरीनंतर या मसुद्याचे कायद्यात रुपांतर होते, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.