‘कुमकुम भाग्य’ फेम झीशान खानचा अपघात

    दिनांक :11-Dec-2025
Total Views |
मुंबई,
zeeshan khan accident,  टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका कुमकुम भाग्य मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता झीशान खान सोमवारी रात्री अपघातातून थोडक्यात बचावला. मुंबईतील यारी रोडवर रात्री साडेदहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. जिममधून घरी जात असताना समोरून येणाऱ्या कारने झीशानच्या गाडीला अचानक धडक दिली. धडक देणाऱ्या गाडीत दोन ज्येष्ठ नागरिक बसले होते. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झाली नाही, मात्र दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा नोंदवलेला नाही.
 

zeeshan khan accident, 
अपघाताची बातमी zeeshan khan accident,  समजताच झीशानच्या चाहत्यांमध्ये चिंता पसरली होती. परंतु तो पूर्णपणे सुरक्षित असल्याचे स्पष्ट होताच त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या घटनेवर झीशानने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.झीशान खानने कुमकुम भाग्य मध्ये आर्यन खन्नाची भूमिका साकारून लोकप्रियता मिळवली. त्यानंतर तो नागिन मालिकेतही झळकला. त्याने बिग बॉस ओटीटीच्या पहिल्या सिझनमध्ये स्पर्धक म्हणून सहभाग घेतला, मात्र विजेतेपद त्याच्या नावावर आले नाही. शो नंतर तो मालिकांमध्ये दिसला नसला तरी त्याचे अनेक म्युझिक व्हिडीओ प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत.झीशान त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत राहिला. अभिनेत्री रेहाना पंडितसोबत त्याचं नाव जोडलं गेलं, विशेष म्हणजे रेहानाने ऑनस्क्रीन त्याच्या आईची भूमिका साकारली होती. दोघांचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांच्या नात्यात दहा वर्षांचे अंतर असले तरी त्यांनी काही काळ डेट केल्याची चर्चा होती. 2024 मध्ये या दोघांनी पुन्हा पॅचअप केल्याच्याही बातम्या समोर आल्या होत्या.सोशल मीडियावर झीशान बऱ्यापैकी सक्रिय असून त्याला मोठा महिला चाहतावर्ग आहे. इन्स्टाग्रामवर त्याचे 9 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे फोटो आणि व्हिडीओंना चाहत्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. *कुमकुम भाग्य* ही मालिका गेल्या अकरा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असून झीशानची लोकप्रियता आजही कमी झालेली नाही.या अपघातातून तो सुरक्षित बाहेर पडल्याने मनोरंजनविश्वातूनही दिलासा व्यक्त केला जात आहे.