सर्वसामाण्यांना मदतीची भूमिका लोकप्रतिनिधींनी स्वीकारावी

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

    दिनांक :12-Dec-2025
Total Views |
नागपूर,
eknath-shinde : सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन वेळप्रसंगी कायदा व लालफितीत न अडकता आवश्यकतेनुसार कायदे बदलण्याची तयारी लोकप्रतिनिधींनी ठेवावी यासाठी माध्यमातून मिळालेल्या आयुधांचा वापर करावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी केले.
 

ekanath-shinde-vidhan-bhawan 
विधानपरिषद सभागृहात राष्ट्रकुल संसदीय मंडळातर्फे ‘लोकप्रतिनिधींची मतदार संघांप्रती असलेली जबाबदारी आणि त्यासाठी सभागृहाच्या माध्यमातून उपलब्ध असलेले संविधानीक व्यासपीठ’ विषयावर मार्गदर्शन करताना एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे, विधानमंडळाच्या सचिव मेघना तळेकर उपस्थित होत्या. 
 
संविधानाच्या सर्व मार्गांचा अवलंब करावा
 
 
मतदारसंघातील नागरिकांनी मला निवडून दिले. त्यामुळे मला त्यांच्यासाठीच काम करायचे आहे, ही भावना सतत जोपासण्याची आवश्यकता व्यक्त करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. लोकांच्या आयुष्यातील दु:ख कमी करून आनंदाने समाधान देण्यासाठी आपल्या पदाचा पुरेपूर वापर करायला हवा. जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून लोकांचे दु:ख कळायला हवे आणि ते संविधानाच्या सर्व मार्गांचा अवलंब केल्यास मतदारसंघातील प्रत्येक नागरिकांचे जीवन सुसह्य होईल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
 
 
सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत
 
 
लोकशाही हे पवित्र मंदिर आहे आणि सर्वसामान्य जनता हेच माझे दैवत आहे. याच भावनेतून एक चांगला लोकप्रतिनिधी चांगला विद्यार्थी होणे गरजेचे आहे. मी आजही स्व:ताला विद्यार्थीच समजतो भावना व्यक्त करताना शिंदे म्हणाले की, लोकशाही प्रणाली लोकाभिमुख व्हावी अशी माझी कायम भुमिका आहे.
 
 
लोकांच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी
 
 
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण व गरिबांना बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, जीवनदायी योजनेत पाच लाखापर्यंतचे उपचार तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमतून अडीच वर्षात ८० रुग्णांना सुमारे ४५० कोटी रुपयांची मदत केली आहे. त्यासोबतच शासन आपल्या दारी सारख्या योजनेचा सुमारे ५ कोटी लोकांनी लाभ घेतला आहे. म्हणून लोकांच्या इच्छा- आकांक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी पार पाडत असल्याचे समाधान असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.