तभा वृत्तसेवा
मारेगाव,
accident : वणी-मारेगाव मार्गावरील सोमनाळा फाट्याजवळ 11 रोजी संध्याकाळी सुमारे 6 च्या सुमारास ट्रक व दुचाकीचा भीषण अपघात झाला. अपघातात दुचाकी स्वारांपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला.
प्रविण तुळशीराम येरमे (वय 42, पिसगाव) असे मृत्यू झालेल्या इसमाचे नाव असून दुसरा युवक गंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळावरून पलायन केल्याची माहिती मिळाली आहे. अपघाताची माहिती मिळताच वणी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. ट्रक चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.