नागपूर
Uddhav Thackeray, लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी हिवाळी अधिवेशन संपण्यापूर्वी दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नेमणूक करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी परिसरात पत्रपरिषदेत केली. उपमुख्यमंत्री संवैधानिक पद नाही. तरी सुध्दा दोन उपमुख्यमंत्री आहे. मी मुख्यमंत्री असताना विरोधी पक्षनेतेही होते. संख्याबळाची आडकाठी विरोधी पक्षनेतेसाठी नको. दिल्लीत ७० पैकी ३ सदस्य असताना भाजपने विरोधी पक्षनेते स्विकारले होते, मग महाराष्ट्रात का नाही? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी प्रथमच दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेतेपद नसल्याने राजकारण तापले आहे. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची उद्धव ठाकरे यांनी भेट घेऊन दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेत्याची नियुक्ती करण्यासंदर्भात निवेदन दिले आहे.विधानसभेत आम्ही सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडत आहोत. ते आमचे कर्तव्य आहे. परंतु, विरोधी पक्षनेत्याला दर्जा असतो. त्याला एक मान असतो, तो प्रशासनाशी, अधिकार्यांशी अधिकाकाराने बोलू शकतो, प्रश्न विचारू शकतो. मात्र, हे सरकार विरोधी पक्षनेता नको या विचारांचे दिसत असल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.