देवळी,
rajesh-bakane : एक वर्षांपूर्वीपर्यंत देवळी विधानसभा मतदार संघाने राजा आमदार बघितला होता. जनतेच्या प्रश्नांपेक्षा स्वत:ला जोपासत स्वत:चे राजकारण २५ वर्षे आमदार राहिलेल्या रणजित कांबळे यांनी ठरवून घेतले होते. मतदारांनी विधानसभा निवडणुकीत कड पलटला आणि भाजपाचे उमेदवार राजेश बकाने निवडून आले. त्यांचा प्रत्येक दिवस आणि तास आता मतदार संघाच्या विकासासाठी लागतो आहे. नागपुरात सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात रात्री २ वाजेपर्यंत जागत त्यांनी आपल्या मतदार संघाचे प्रश्न मांडले. पुलगाव येथील नझूलचा प्रश्न आणि मतदार संघातील चाळणी झालेल्या रस्त्यांसाठी विेशेष पॅकेज देण्याची मागणी त्यांनी अर्ध्या रात्री केली. राजकीय क्षेत्रात लोकप्रतिनिधींची जबाबदारी किती मोठी असते याचा प्रत्यय कालच्या अधिवेशनात पुन्हा एकदा आला.
रात्री २ वाजेपर्यंत सभागृहात मतदारसंघाच्या प्रश्नांसाठी उभे राहिलेल्या आ. राजेश बकाने यांनी अधिवेशनात मतदारसंघाशी संबंधित महत्त्वाच्या मुद्यांवर चर्चा सुरू असताना रात्रीचा प्रहर सुरू झाला आणि सभागृहातील अनेक सदस्यांनी आपल्या जागा सोडायला सुरुवात केली. परंतु, देवळी मतदारसंघातील शेती, पायाभूत सुविधा, आरोग्य व रोजगाराच्या प्रश्नांना न्याय मिळावा, सरकारने निर्णय द्यावा अशी मागणी आ. बकाने यांनी अर्ध्या रात्री सरकारकडे केली. मतदार संघातील जनतेचे प्रश्न शासनापुढे मांडल्याशिवाय सभागृह सोडण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे आ. बकाने यांनी बोलून दाखवले. मतदार संघातील शेतकर्यांना होणारा रानडुकर, रोही आणि इतर जंगली जनावरांचा त्रास टाळण्यासाठी मध्यप्रदेश सरकारच्या धरतीवर महाराष्ट्र सरकारनेही बोमा तंत्राचा वापर करून रानडुक्कर, रोही यांना जंगलात नेऊन सोडावे अशी मागणी लावून धरली.
देवळी पुलगाव मतदार संघातील सर्व रस्त्यांची अवस्था दयनिय असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे आ. बकाने यांनी देवळी रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी विशेेष पॅकेज देण्याची मागणी केली तर ७५ टक्के पुलगाव शहर हे नझूलच्या जागेवर वसलेले आहे. तेथे फ्री होल्डचा विषय अतिशय संथ गतीने सुरू असून त्या विषयाला गती देण्याची मागणी सुद्धा आ. राजेश बकाने यांनी सभागृहात केली. रात्री २ वाजेपर्यंत जागा न सोडणार्या आ. बकाने यांची आता माजी आमदार रणजित कांबळे यांच्या कार्यशैलीसोबत तुलना होऊ लागले आहे.