अनिल कांबळे
नागपूर,
Adv. Abhay Sambare, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातील हायकाेर्ट बार असाेसिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक शुक्रवारी माेठ्या उत्साहात पार पडली. मतदानानंतर रात्री उशीरा निवडणूक आयाेजन समितीने अंतिम निकाल जाहीर केला. या निवड प्रक्रियेत अॅड. अभय सांबरे अध्यक्षपदी निवडून आले. उपाध्यक्षपदासाठी दाेन जागांसाठी मतदान झाले पुरुष गटातून अॅड. गणेश खानजाेडे उपाध्यक्ष झाले, तर महिला गटातून अॅड. स्मिता देशपांडे निवडून आल्या. सचिवपदी अॅड. एस. आर. भाेंगाडे यांना बहुमत मिळाले, तर काेषाध्यक्षपदी अॅड. आर. आर. इनामदार तिवारी यांची निवड झाली. सहसचिवपदी अॅड. पी. के. माेहता तर ग्रंथपाल प्रभारीपदी अॅड. एस. के. फलटनकर यांची निवड झाली.
कार्यकारी सदस्यांच्या Adv. Abhay Sambare, निवडणुकीत 17 उमेदवार रिंगणात हाेते, त्यापैकी सहा जण विजयी झाले. विजयी उमेदवारांमध्ये अॅड. एम. एम. जाेशी, अॅड. टी. ए. मिर्झा ताबिश, अॅड. के. एन. जैन, अॅड. आर. के. केवळे, अॅड. एच. व्ही. ढगे, अॅड. व्ही. पी. इंगळे यांचा समावेश आहे. महिला सदस्य म्हणून अॅड. आय. डी. ठाकरे, अॅड. एस. डी. गुप्ता, आणि अॅड. बी. एस. नेहा अग्रवाल विजयी झाल्या. निवडणूक प्रक्रिया पार पाडण्यासाठी अॅड. प्रकाश मेघे, अॅड. भानुदास कुळकर्णी, अॅड. अरुण पाटील, अॅड. देऊल पाठक, अॅड. संग्राम शिरपूरकर, अॅड. निखील पाध्ये, अॅड. वैशाली खेडकर, आणि अॅड. मुग्धा चांदुरकर यांनी माेलाचे याेगदान दिले.