४९ सामने, १० दिवस आणि १० संघ

13 Dec 2025 17:14:09
वर्धा,
Agnihotri Premier League WPL जय महाकाली शिक्षण संस्था संचालित अग्निहोत्री ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्सच्या वतीने स्थानिक रामनगर येथील सर्कस मैदानावर अग्निहोत्री प्रीमियर लीग डब्ल्यूपीएल २०२५ क्रिकेट स्पर्धेला टी ट्वेंटी सारख्या सामन्यांच्या धर्तीवर शानदार सुरुवात झाली. जिल्ह्यातील १० संघ, १० दिवस ४८ सामने खेळणार आहेत. फटायांची आतषबाजी, ढोलताशे आणि बॅण्ड शो असलेली भव्य स्पर्धा वर्धेकर क्रीडाप्रेमींनी प्रथमच अनुभवली.
 

Agnihotri Premier League WPL 
जय महाकाली शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षण, संस्कार, संस्कृतीचे धडे गिरवले जातात. सभ्यतेच्या पुढे जात विद्यार्थ्यांमध्ये खेळांची रूची वाढवण्यासाठी शाळेच्या वतीने पुढाकार घेतल्या जातो. खेळाचा विकास फत शाळेच्या मैदानापर्यंतच मर्यादित न राहता जिल्ह्यातील क्रिकेट खेळाडूंच्या प्रतिभेला अजून लकाकी मिळावी या उद्देशाने पाच वर्षांपासुन अग्निहोत्री प्रीमियर लीग डब्ल्यूपीएलचे आयोजन करण्यात येते. यावर्षी स्पर्धेच्या उद्घाटनाला थोडी नावीन्यता आणण्याचा प्रयत्न केला. तालुका वा गावखेड्यातून आलेल्या क्रिकेट खेळाडूंना मेट्रो सिटीत स्पर्धेत उतरण्याचा फिल यावा यासाठी प्रयत्न केले. वर्धेकर क्रीडा प्रेमींनी स्पर्धा आता डोयावर घेतल्या सारखे दिसु लागले आहे. पुढीलवर्षीपासुन कबड्डी आणि खो-खो या खेळांचाही आम्ही समावेश करू, असे आयोजक सचिन अग्निहोत्री यांनी सांगितले.
समारोहाचे प्रमुख आकर्षण म्हणून जॉन बँड म्युझिकल ग्रुप, दैवत वाद्य पथक, तसेच रोमहर्षक फायर शो यांनी उपस्थित प्रेक्षकांचे मन वेधून घेतले. या सोहळ्याचे मुख्य आयोजक म्हणून जय महाकाली शिक्षण संस्थेचे सचिव सचिन अग्निहोत्री यांचे योगदान आहे. भारतीय पारंपरिक खेळांना बळ मिळावे या हेतूने एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली. भविष्यात कबड्डी आणि खो-खो या राष्ट्रीय खेळांचा समावेश करून घेण्याची ग्वाही आयोजकांनी दिली. यामुळे ग्रामीण तसेच शालेय पातळीवरील क्रीडा संस्कृतीला नवे व लक्षणीय बळ मिळणार असा विश्वास व्यत केला. मैदानात ट्रॉफीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. १० दिवस चालणार्‍या या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी मजबूत प्रेक्षक दीर्घा तयार करण्यात आल्या आहे. उद्घाटन कार्यक्रमाला सचिन अग्निहोत्री, ओम संयाम, अविनाश सेलोकर, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत देशमुख, संजय तिगावकर, पराग मिटकरी, आदी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0