आर्वी शहरातून जाणार्‍या रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करा

13 Dec 2025 17:20:49
आर्वी,
Amar Kale शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम बर्‍याच वर्षांपासून रखडल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन आर्वी शहरातून जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम १५ दिवसात पूर्ण करण्याच्या सुचना संबंधीतांना देण्यात याव्या, अशी विनंतीवजा मागणी खा. अमर काळे यांनी केली आहे.
 

Amar Kale 
वरुडवरून Amar Kale येणारा व आर्वी शहरातून पुलगावकडे जाणार्‍या मुख्य रस्त्याचे काम बर्‍याच वर्षांपासून सुरू आहे. या रस्त्यावर शाळा, महाविद्यालये, बसस्थानक, दवाखाने व शासकीय कार्यालय असून या मार्गावर सतत मोठी वर्दळ असते. या रस्त्याचे काम सुरू होऊन बरेच वर्ष झाले पण, अजूनही काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे या रस्त्यावरून वाहन चालवितानाच नव्हे तर पायदळ चालताना मोठी कसरत करावी लागते. आर्वी शहरातील कदम यांच्या दवाखान्यापासून ते छत्रपती शिवाजी चौकापर्यंतच्या रस्त्याच्या अर्धवट कामामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या रस्त्यावरून विद्यार्थ्यांना शाळा, महाविद्यालयात जाताना जीव मुठीत घेऊन जावे लागते. या रस्त्यावर एका विद्यार्थिनीला अपघातात जीव गमवावा लागला, असेही खा. काळे यांनी सांगितले. या रस्त्याचे काम पुर्ण करण्याच्या निर्देश संबंधित विभागाला द्यावे, अशी मागणी केली. ना. गडकरी यांनी रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
Powered By Sangraha 9.0