मुंबई,
Celina Jaitly legal case, बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस इंडिया सेलिना जेटली हागच्या वैयक्तिक आयुष्यातील दीर्घकाळ चालू असलेला कायदेशीर वाद आता गुन्हेगारी स्वरूपाला प्राप्त झाला आहे. अभिनेत्रीने आपल्या ऑस्ट्रियन पती पीटर वोल्फगँग हाग यांच्याविरोधात मुंबईतील वर्सोवा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाची फौजदारी तक्रार दाखल केली आहे.
सेलिनाच्या Celina Jaitly legal case, तक्रारीनुसार, हाग यांनी तिला फसवले असून, तिच्या विरोधात गुन्हेगारी विश्वासघात, फ्रॉड, चुकीच्या पद्धतीने दबाव टाकून कागदपत्रांवर स्वाक्षरी करून घेणे तसेच महिलेच्या सन्मानाला धक्का पोहोचवणे अशा गंभीर आरोपांसह गुन्हा दाखल केला आहे. या तक्रारीमुळे पूर्वी फक्त कौटुंबिक आणि मालमत्ता वाद म्हणून सुरु असलेले प्रकरण आता थेट क्रिमिनल कायद्याच्या चौकटीत आले आहे.या प्रकरणाची सुरुवात मुख्यत्वे वर्सोवा येथील एक आलिशान फ्लॅट आहे. सेलिनाचा दावा आहे की, ही मालमत्ता तिने 2004 साली पूर्णपणे स्वतःच्या कमाईतून खरेदी केली होती आणि भारतातील तिची एकमेव मालमत्ता होती. मात्र, 2019 मध्ये एका गिफ्ट डीडच्या माध्यमातून हा फ्लॅट बेकायदेशीररीत्या हस्तांतरित केला गेला आणि तिने दबावाखाली त्यावर स्वाक्षरी केली होती, असे तिने नमूद केले आहे. या फ्लॅटचा अंदाजे बाजारभाव सुमारे 17 कोटी रुपये असून, त्याचे क्षेत्रफळ 1565 चौरस फूट आहे आणि त्यासोबत 2000 चौरस फूट खासगी टेरेस आहे.या वादाबाबत पीटर वोल्फगँग हाग यांनी प्रतिक्रीया देताना सर्व आरोप खोटे आणि निराधार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचा दावा आहे की, हा वाद फक्त वैयक्तिक आणि मालमत्तेच्या स्वरूपाचा असून, त्याला गुन्हेगारी रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रारीच्या आधारे प्राथमिक चौकशी सुरु झाली असून, प्रकरणातील कागदपत्रे, मालमत्तेचे व्यवहार आणि दोन्ही बाजूंचे जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. सेलिना जेटली हिच्या या तक्रारीमुळे पूर्वी सीमापार वैवाहिक आणि मालमत्ता वाद म्हणून चर्चेत असलेले प्रकरण आता कायदेशीरदृष्ट्या अधिक गुंतागुंतीचे बनले आहे.या प्रकरणाची पुढील वाटचाल कोणत्या दिशेने होते, याकडे पोलिस आणि कायदेविषयक तज्ज्ञांचे लक्ष लागलेले आहे.