उपराजधानीत थंडीचे पुन्हा तीन बळी ?

13 Dec 2025 21:49:42
अनिल कांबळे
नागपूर, 
deaths-due-to-cold : अधिवेशनादरम्यान उपराजधानीत आपापल्या मागण्यांचे निवेदने घेऊन राज्यातील कानाकोपऱ्यातून मोर्चेकरी येत असतात. त्या पार्श्वभूमीवर आंदाेलकांची दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तात्पुरत्या निवाऱ्याची साेय करण्याचे आदेश दिले. मात्र, शहरातील बेघरांचे हाल बेहाल असून कडाक्याच्या थंडीची झळ बसत गेल्या तीन दिवसांत सहा जण थंडीमुळे दगावल्याची माहिती समाेर आली आहे.
 
 
thandi
 
तीन घटनांपैकी दाेन घटना मेडिकल आणि मेयाेच्या हद्दीत घडल्या. तर तिसरा मृत्यू हा वाडी पाेलिस ठाणे हद्दीतील तवक्कल ले आऊट भागातल्या पदपथावर झाला. अजनी पाेलिस हद्दीतील मेडिकलच्या वाॅर्ड क्रमांक दाेनला लागून असलेल्या प्रतिक्षालयात एक 60 वर्षीय व्यक्ती बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती पाेलिस चाैकीला देण्यात आली. पाेलिसांनी त्याला तत्काळ मेडिकलच्या आपत्कालिन विभागात नेले असता तिथे डाॅक्टरांनी मृत घाेषित केले.
 
 
मेयाेच्या वाहनतळाला लागून असलेल्या एक्सरे विभागाजवळ अंदाजे 50 वर्षे वयाची एक महिला बेशुद्धावस्थेत आढळली. तिला पाेलिसांनी आपत्कालिन विभागात नेले असता डाॅक्टरांनी मृत घाेषित केले. कडाक्याच्या थंडीत निवारा शाेधत बेशुद्धावस्थेत आढळेला तिसरा व्यक्ती वाडी पाेलिस हद्दीत पथपथावर सापडला. त्यालाही पाेलिसांनी मेयाेत नेले. मात्र पाेलिसांनी मृत घाेषित केले. तिन्ही प्रकरणात पाेलिसांनी आकस्मात मृत्यूची नाेंद केली असून तिघांचीही ओळख अद्याप पटलेली नाही. थंडीत ऊब न मिळाल्याने या तिघांचा मृत्यू झाला असवा, असा अंदाज वैद्यकीय सूत्रांनी व्यक्त केला.
Powered By Sangraha 9.0